शेतकऱ्यांना दहा हजार मास्कचे वाटप

नाशिक बाजार समिती येथे
शेतकऱ्यांना दहा हजार मास्कचे वाटप


पंचवटी | Panchavati

मानव उत्थान सामाजिक संस्था आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...

भाजीपाला विक्रीसाठी आणणा-या शेतकऱ्यांना मास्क व आर्सेनिक अल्बम च्या वाटपाचे सोमवारी (ता .२१) रोजी सुरू करण्यात आले.


गेल्या सहा ते सात महिन्यांपासुन देशासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या महामारीतीतुन सर्व सामान्यांना वाचविण्यासाठी अनेक सामाजिक संघटना,संस्था ट्रस्ट पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मानव उत्थान सामाजिक संस्थेने मास्क वाटप,आर्सेनिक अल्बम, लॉक डाऊन काळात किराणा वाटप, अन्नदान असे विविध कार्यक्रम राबविले आहेत.

सोमवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात जिल्हाभरातून भाजीपाला ,फळभाज्या व शरदचद्रजी मार्केट यार्डात कांदा बटाटा, टँमोटो,डाळींब घेऊन शेतकरी येत असतात.

मानव उत्थान तर्फे जवळपास दहा हजार मास्क व एक लाख आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप करणार आहेत सोमवार पासून या मोहिमेची बाजार समिती सभापती व संचालक मंडळ यांनी सुरुवात केली.

यावेळी मानव उत्थानचे जगबिर सिंग , अली अकबर पठाण , डॉ. शलोद सय्यद व बाजार समिती सभापती देविदास पिंगळे,संचालक दिलीप थेटे,विश्वास नागरे,तुकाराम पेखळे,रवी भोये आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com