आदर्श शिक्षक पुरस्काराचे आज वितरण

आदर्श शिक्षक पुरस्काराचे आज वितरण

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी ९ ( Lions Club of Sinnar City ) कडून देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार ( Teacher's Award )जाहीर करण्यात आले असून रविवारी (दि.5) शहरातील पंचवटी हॉटेलमध्ये सकाळी 10 वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

संस्थेने नुकतेच 22 व्या वर्षात पदार्पण केले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सिन्नर शहर व तालुक्यात प्रतिष्ठित मानले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जाणार आहेत.

प्राथमिक विभागात चास येथील पांढरे वस्तीवरील जि. प. सेमी इंग्रजी शाळेचे शिक्षक सोमनाथ पथवे व चास येथील हिवर शेतवरील जि. प. शाळेच्या अर्चना भालेकर यांना तर माध्यमिक विभागातून सिन्नर येथील वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ व शहरातील मातोश्री चांडक कन्या विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक दिपक बाकळे यांना पुरस्कर देण्यात येणार आहेत.

उच्च माध्यमिक विभागातून सिन्नर महाविद्यालयाचे डॉ. प्रकाश कोकाटे यांना पुरस्कार जाहिर झाला आहे. तर जीवनगौरव पुरस्कार पाथरे येथील चांगदेव गुंजाळ यांना घोषित झाला आहे. पुरस्काराचे वितरण इगतपुरी येथील पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

याप्रसंगी अध्यक्ष संजय सानप, सेक्रेटरी सोपान परदेशी, खजिनदार कल्पेश चव्हाण, डॉ. विजय लोहारकर, हेमंत वाजे, भरत गारे, डॉ. डी. एम. गडाख, प्रा. टी. बी. खालकर, मनिष गुजराथी, भुषण क्षत्रिय, जितेंद्र जगताप, डॉ. सुजाता लोहारकर, प्रकल्प प्रमुख शिल्पा गुजराथी, संगिता कट्यारे, अर्चना चव्हाण, अपर्णा क्षत्रिय उपस्थित राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com