तपस्वी पत्रकारिता पुरस्काराचे वितरण

तपस्वी पत्रकारिता पुरस्काराचे वितरण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

समाजाभिमुख, निष्पक्ष, निर्लोभ पत्रकरिता आजही करता येण्यासारखी आहे व तीच केली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार नरहरी भागवत (Senior journalist Narhari Bhagwat ) यांनी आज केले.

साप्ताहिक मावळ मराठाच्या ( Maval Maratha ) आठराव्या वर्धापन दिना निमित्त आज प्रदीर्घ उल्लेखनीय 'तपस्वी पत्रकारिता पुरस्कार' ( Tapasvi Patrkarita Purskar' ज्येष्ठ पत्रकार नरहरी भागवत यांंना आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीत भागवत बोलत होते.

अध्यक्षस्थानी विधान भवनाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने होते. देशदुतच्या कार्यकारी संंपादक डॉ. वैशाली बलाजीवाले, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक शैलेंद्र तनपुरे, दिव्य मराठीचे संपादक जयप्रकाश पवार,अभिजित कुलकर्णी विशेष अतीथी होते. ज्येष्ठ पत्रकार अनंंत येवलेकर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.

भगावत पुढे म्हणाले की, हल्ली वर्तमान पत्र झटपट वाचुन मोकळे होते. वाचक सोशल मिडीया कडे वळले. असे म्हटले जाते. त्याला विविध कारणे आहेत. त्यावर सकस अभ्यासपुर्ण लिखानाची मात्रा गरजेची आहे. समाजाभिमुख पत्रकारितेचीे कास धरली, प्रलोभना पासुन दुर राहिले तर पत्रकारीतेला आजही गत वैभव प्राप्त झाल्या शिवाय राहणार नाही.

यावेळी त्यांंनी दिंवंगत खा. उत्त्तमराव ढिकले यांंच्या आठवणींंना उजाळा दिला. नाशिकच्या राजकीय नेतृत्वाला स्थानिकांचे भक्कम पाठबळ मिळाले असते तर नाशिकचाही विकास अजुन झपाट्यने झाला असता. असेही ते म्हणाले. नाशिकचा विकास करतांना येथील उद्योगधंंदे वाढीस लागले पाहीजे. व प्रत्येक हाताला काम मिळाले पाहीजे. त्यावशिवाय प्रगती शक्य नाही असे त्यांंनी स्पष्ट केले.

अ‍ॅ‍ॅड. ढिकले यांनी भागवत यांच्या ऋषीतुल्य पत्रकारीतेचा गौरव केला. त्यांचे नावे एखााद्या वास्तुला अथवा रस्त्याला देऊन त्यांच्या क़ार्याचा यथोचीत गौरव निश्‍चीत केला जाईल असे त्यांनी अश्‍वासन दिलेे.

डॉ. वैशाली बालाजीवाले, तनपुरे, अभिजित कुलकर्णी, विश्‍वस मदाने, कांंतीलाल कोेठारी, विलास देवळे यांंचे समयोचीत भाषण झाले. भागवत म्हणजे एक विद्यापीठच असुन आम्ही सर्व त्यांचे विद्यार्थी असल्याचे त्यांंनी सांगितले. अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना मदाने यांनी भागवत यांच्या गौरवशाली पत्रकारितेचे कौतुक करुन आजचा पुरस्कार म्हणजे गोदोवरी तीराने तपस्वी पत्रकारांना दिलेली मानवंंदना असल्याचे स्पष्ट केले.

रविंद्र मालुंंजकर यांनी सुत्रसंचालन केले. मावळ मराठाचे संपादक सदानंद खोपकर यांनी स्वागत, प्रास्तावीक केले. सीमंतीनी खोपकर यांनी आभार मानले. यावेली शंंकर बोर्‍हाडेे, श्रीकांत बेणी, नंदु मुठे, उल्हास धनवटे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.