पेठ तालुक्यातील एक हजार करोना योध्यांना मदतीचा हात !

सोशल नेटवर्कींग फोरमतर्फे सुरक्षा साहित्याचे वाटप
पेठ तालुक्यातील एक हजार करोना योध्यांना मदतीचा हात !

पेठ | Peth

गत 10 वर्षा पासून पेठ तालुक्यात आरोग्य, शिक्षण व पाणी या तीन महत्वाच्या गरजांवर सातत्याने काम करणाऱ्या योध्याना सोशल नेटवर्कींग फोरमने मदत केली आहे.

पेठ तालुक्यातील गाव स्तरावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी, पोलीस कर्मचारी अशा जवळपास हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 3 मास्क, सॅनिटायझर व फेसशिल्ड चे वाटप करून स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या करोना योध्यांचा सन्मान केला आहे.

पेठ तालुक्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या सर्व कर्मचारी यांना रचना ट्रस्ट व जेनिक्स इंजिनियरिंग यांच्या योगदानातून सोशल नेटवर्कींग फोरमने साहित्य उपलब्ध करून दिले.

गाव स्तरावर घरोघर जाऊन कोरोना रुग्णांचा शोध घेणाऱ्या आशा कर्मचारी, सर्वेक्षणात महत्वाची भूमिका असलेल्या अंगणवाडी सेविका, कोरोना संकटातही शहर स्वच्छ करणारे नगरपंचायत सफाई कर्मचारी व रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले पोलीस कर्मचारी यांच्या सुरक्षेची काळजी सोशल नेटवर्कींग फोरमने घेतल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

पेठ तालुक्यातील वाडी वस्तीवर करोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यात घरोघर जाऊन सर्वेक्षण व जनजागृतीचे काम करणाऱ्या महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी सोशल नेटवर्कींग फोरमने सुरक्षा साहित्य उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

- संदिप भोसले, तहसीलदार पेठ

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com