विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड वितरण; दर महिन्याला होणार मदत

विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड वितरण; दर महिन्याला होणार मदत

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील दातली माध्यमिक विद्यालयात मुलींना अभिषेक सामाजिक संस्था (Abhishek Social Organization) व ‘ती’ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सॅनिटरी पॅडचे वाटप (Distribution of sanitary pads) करण्यात आले. ‘ती’ फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ. भारती लवेकर (dr. bharti lavekar) यांच्या हस्ते पॅडचे वितरण करण्यात आले.

मासीक पाळी (Menstruation) हा आपल्याकडे गुप्ततेचा विषय केला जातो. परिणामी त्या दिवसात स्वच्छतेकडे दुर्लक्ष (Neglect of cleanliness) होते. याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकीतून दोन्ही फाऊंडेशनकडून राज्यभरात विद्यालयातील मुलींना पॅडचे वाटप करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात (nashik district) प्रथमच संस्थेच्या पुढाकाराने दातली विद्यालयात उपक्रमाची सुरुवात झाली. यापुढेही विद्यालयातील मुलींना दरमहा पॅड पुरवणार असल्याचे अभिषेक संस्थेच्या अध्यक्षा नागरे यांनी स्पष्ट केले.

पॅड वाटप केल्यानंतर मासीक पाळी (Menstruation) म्हणजे काय, त्यावेळी कापड वापरण्याच्या पारंपरिक पध्दतीचे तोटे, सॅनिटरी पॅडस (sanitary pads) का वापरायचे, पाळीच्या दिवसात घ्यावयाची स्वच्छतेची काळजी, पॅडस वापरणे व त्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी याची माहिती दिली. मुख्याध्यापक अशोक सांगळे यांनी संस्थेचे आभार मानले. प्रास्ताविक एन. एच. चांदोरे यांनी केले. यावेळी विकास चांदोरे, पोलीस पाटील सुनील चांदोरे, ग्रामपंचायत सदस्य हेमंत आव्हाड, अभिषेक नागरे, पिंकी पाटील, सुरेश रासकर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com