बांधकाम कामगारांना सुरक्षा आणि अत्यावश्यक संचाचे वाटप

बांधकाम कामगारांना सुरक्षा आणि अत्यावश्यक संचाचे वाटप

नाशिक | Nashik

राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या (Nationalist Mathadi and General Labor Union) वतीने शहर व ग्रामीण भागातील सर्व गरजू बांधकाम कामगारांना (Construction workers) सुरक्षा आणि अत्यावश्यक संचासह ई-श्रम कार्डाचे वाटप करण्यात आले...

महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) बांधकाम मजुरांना कामावर गेल्यावर कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, त्यांची सुरक्षा व्हावी,यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध योजना राबविलेल्या आहेत. त्यामध्ये मध्यान्ह भोजन, सुरक्षा संच, ई-श्रम कार्ड, यांच्या माध्यमातून त्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन निधी, लग्नासाठी साहित्य,अशा वेगवेगळ्या योजनांचा (Plan) समावेश आहे.

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनचे नाशिक जिल्हाध्यक्ष रोहित पवार, जिल्हा कार्याध्यक्ष विवेक बिऱ्हाडे, कैलास गावित, सचिन सुर्यवंशी, सागर गावित यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com