अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना ५५ कोटींचा निधी

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना ५५ कोटींचा निधी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सन 2021-2022 या वर्षात आदिवासी बहुल 9 तालुक्यामधील 575 ग्रामपंचायतींना (Gram Panchayat) आदिवासी उपयोजनेंतर्गत विकासकामांसाठी (Development Work) जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिकद्वारा  जिल्हाधिकारी कार्यालयाकडील निधी वितरण आदेशानुसार 55 कोटी 86 लक्ष 20 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे...

अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या प्रमाणात निधी थेट पेसा ग्रामपंचायतीना वितरित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना 5 टक्के अबंध निधी योजनेचा निधी दि. 24 मार्च 2022 रोजी थेट ग्रामपंचायतींना वितरित होत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील विकासकामांना गती मिळणार आहे.

जिल्ह्यातील नाशिक (Nashik), इगतपुरी (Igatpuri), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), पेठ (Peth), सुरगाणा (Surgana), दिंडोरी (Dindori), कळवण (Kalwan), बागलाण (Baglan), देवळा (Deola) या नऊ तालुक्यातील 575 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.महागाईचा भडका! आजही पेट्रोल-डिझेलचे दर वधारले

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना ५५ कोटींचा निधी
महागाईचा भडका! आजही पेट्रोल-डिझेलचे दर वधारले

1479 गावांना या निधीचा लाभ होणार आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामपंचायतींच्या खात्यात झेडपीएफएमएस (ZPFMS) प्रणालीद्वारे थेट निधीचे वितरण हे केले गेले आहे. हा निधी संबंधित ग्रामपंचायतीने त्या अंतर्गत येणार गाव, वस्ती, वाडी, पाडा यांच्या अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच उपलब्ध करून देण्यात आलेला निधी बाबनिहाय खर्च करतांना अ) पायाभूत सुविधा ब) वन हक्क अधिनियम (FRA ) व पेसा कायद्याची अमंलबजावणी क) आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व ड) वनीकरण, वन्यजीव संवर्धन, जलसंधारण, वनतळी, वन्यजीव पर्यटन व वन उपजिविका या बाबींकरीता प्रत्येकी १/४ या प्रमाणात विनियोगात आणावा असे शासन आदेश आहेत.

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना ५५ कोटींचा निधी
दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी (Ravindra Pardeshi) यांनी याबाबत माहिती दिली असून संपूर्ण निधीचा (Fund) योग्य विनियोग कसा होईल याबाबत नियोजन करण्याचे आदेश पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना निर्गमित केले आहे.

तालुका -

1) नाशिक

ग्रामपंचायत संख्या - 32

पेसा गावे - 49

प्राप्त निधी - 3,00,05,356/-

2) इगतपुरी

ग्रामपंचायत संख्या - 64

पेसा गावे - 118

प्राप्त निधी - 4,48,61,352/-

3) त्र्यंबकेश्वर

ग्रामपंचायत संख्या - 84

पेसा गावे - 118

प्राप्त निधी - 7,92,36,050/-

4) पेठ

ग्रामपंचायत संख्या - 73

पेसा गावे - 208

प्राप्त निधी - 6,79,84,344/-

5) सुरगाणा

ग्रामपंचायत संख्या - 61

पेसा गावे - 279

प्राप्त निधी - 10,12,83,596/-

6) दिंडोरी

ग्रामपंचायत संख्या - 104

पेसा गावे - 193

प्राप्त निधी - 9,33,20,916/-

7) कळवण

ग्रामपंचायत संख्या - 86

पेसा गावे - 201

प्राप्त निधी - 8,48,50,042/-

8) बागलाण

ग्रामपंचायत संख्या - 49

पेसा गावे - 74

प्राप्त निधी - 4,73,61,599/-

9) देवळा

ग्रामपंचायत संख्या - 22

पेसा गावे - 29

प्राप्त निधी - 97,16,745/-

एकूण

ग्रामपंचायत संख्या - 574

पेसा गावे - 1479

प्राप्त निधी - 55,86,20,000/-

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना ५५ कोटींचा निधी
Visual Story : मोस्ट अवेटेड 'KGF Chapter 2' चे गाणे 'या' दिवशी होणार रिलीज

पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना प्राप्त होणारा निधी हा आदिवासी जनतेच्या कल्याणाकरिता खर्च करण्यात येईल. याबाबत ग्रामपंचायतींनी योग्य ती खबरदारी घेऊन नियोजन करावे व पेसा ग्रामपंचायतीने त्या अंतर्गत येणाऱ्या पेसा गावांच्या 2011 च्या जनगणनेतील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येनुसार त्या प्रमाणात हा निधी खर्च करत या भागातील पायाभूत विकासकामांना गती द्यावी असे आदेश ग्रामपंचायत विभागास देण्यात आले आहे.

- लीना बनसोड, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक.

Related Stories

No stories found.