नाशिक । प्रतिनिधी Nashik

वसंत सोशल फाऊंडेशन आयोजीत क्रांतीवीर वसंतराव नाईक पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले. क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, श्री सिध्दीविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे, व फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदू सानप यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले.

नाशिकमधून सामाजिक क्षेत्रातून कोंडाजी आव्हाड, ॲड. पी.आर. गिते, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, आरोग्य क्षेत्रातून डॉ. सचिन सोपान भाबड, उद्योजकता क्षेत्रातून गर्व्हेमेंट कॉन्ट्रक्टर सागर विंचू, क्रीडापट्टू कविता राऊत यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने गौरव झाला.

क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या कायार्चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सन २०११ पासून वसंत सोशल फाऊंडेशनची स्थापना झाली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय क्रांतीवीर वसंतराव नाईक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा संस्थेचे यंदाचे १० वे वर्ष असुन राज्यातील विविध क्षेत्रातील ४१ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यात डॉक्टर,नर्स, पोलीस, जवान, शैक्षणिक, राजकीय, समाजसेवा आदी क्षेत्रातील पुरस्कारार्थीचा समावेश आहेत. सोमवारी (दि. २८) क्रांतीवीर वसंतराव नाईक राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. पुरस्कार हा आपल्या चांगल्या कार्याची पावती आहे. पुरस्कारामुळे प्रेरणा अन उर्जा मिळत असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा युवा संत डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांनी यावेळी केले.

पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे

अनुराधा शिवगुंडे, अलका विभुते (अक्कलकोट), मेहेबूब सय्यद, अनिल फड, डॉ. महेश आहेर, किर्ती जाधव, संजय पालवे, डॉ. सागर म्हैसधूणे, लेखिका कल्पना डोईफोडे, अनिल वाबळे, मुक्ता सानप, ज्योती मुंडे, श्रीनिवास गीते, पीएसआय वैशाली मुकणे, लक्ष्मण पानसरे, विजय घोलप, श्रद्धा गंधास, रुपाली बोडके, डॉ. सतीश गवई (नाशिक), रावसाहेब फड (मुंबई), मेजर शिवाजी बोथे (देवळाली), लक्ष्मी गरकळ, युवराज भुजबळ (पुणे), डॉ. योगेश बोढरे (पालघर), डॉ. भूषण लाहोरे (नगर), किशोर शेटे, किशोर माळी, मल्लिनाथ चौधरी, सायरा शेख (सोलापूर), समाससेवक भाऊसाहेब फड (संगमनेर), सागर राऊत (श्री दत्त फाऊंडेशन), किशोर सोनवणे (वर्तमानपत्र प्रतिनिधी), नुतन मिस्री (आंतरराष्ट्रीय सौंदर्यवती) आदींना यावेळी वंसतराव नाईक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.