नाशिक | प्रतिनिधी

करोनाचा उद्रेक रोखण्यासाठी पोलीस व महानगर पालिकेच्या वतीने शहरातील बाजार पेठांमध्ये प्रवेशासाठी प्रत्येकी ५ रूपयांची पावती बंधनकारक केली आहे. काल दिवसभरात १ हजार ७६५ पावत्यांचे वितरण करण्यात आले. तर सामाजिक अंतर न पाळणार्या अस्थापनांंवरील कारवाईसह काल एकाच दिवसात एकुण १ लाख ८४ हजार ८२५ रूपयांचा दंड वसुल करण्यात आला.

शहर तसेच जिल्ह्यात करोनाच्या दुसर्या लाटेचा मोठा उद्रेक झाला आहे. ही लाट रोखण्यासाठी नागरीकांना गर्दीपासून दुर ठेवण्यासाठी शहर पोलीस व महानगर पालिकेने शहरातील मुख्य बाजार पेठांमध्ये बॅरेकेडींग केले असून प्रवेशासाठी ५ रूपये शुल्क आकारणी सुरू केली.

काल एकाच दिवसात भद्रकाली, पंचवटी, गंगापूर, सातपूर, अंबड, इंदिरानगर आदी बाजार पेठांमध्ये मिळून १ हजार ७६५ पावत्या देण्यात आल्या आहेत. तर ८ हजार ८२५ रूपये दंड वसुल करण्यात आला. एकाच पावतीवर अनेकांनाची रक्कम एकत्र करून पावती दिली जात असल्याने नागरीकांचा आकडा यापेक्षा दुप्पट असल्याचे सांगण्यात आले.

याबरोबरच मास्क न वापरणार्यांविरोधात शहर पोलिसांकडून बुधवार (दि.१७)पासून कारवाई सुरू आहे. आज सामाजिक अंतर न पाळणार्या अस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आज एकाच दिवसात ५९ अस्थापनांवर कारवाई करत २ लाख ७६ हजार रूपयांचा दंड वसुल केला आहे.

शहरातील भरपूर वर्दळ असलेल्या ठिकाणीच नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याची गंभीर बाब पोलिसांच्या कारवाईतून समोर आली असून, प्रशासनाने अशा भागांना सातत्याने लक्ष केले आहे. कोरोनाचा धोका वाढला असून, अर्थचक्र सुरळीत ठेवताना प्रशासनाला करोनावर मात करायची आहे. यात नागरिकांची जबाबदारी मोठी असून, सामाजिक अंतर, मास्क वापराशिवाय करोनाला दूर सारणे शक्य होणारे नाही.

मात्र, अनेक नागरिक बेफिकीर असून, या नियमाचे उल्लंघन होताना दिसते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मास्कचा व्यवस्थित वापर न करणार्या व सामाजिक अंतर न पाळणार्या नागरिक व अस्थापनांना रडरावर घेतले आहे.

अंबड हा औद्योगिक वसाहतीचा व सर्वाधिक लोकसंख्या असलेला भाग आहे, या भागात गर्दी अधिक होते. मात्र, याच गर्दीत नियमांकडे दुर्लक्ष होते आहे. पंचवटीचा बाजारपेठेचा भाग आणि बाजारसमितीची दररोजची खरेदी विक्री यामुळे येथेही कारवाई झाली असून, अंबड प्रमाणेच भद्रकाली पोलिस ठाण्याची स्थिती आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या या कारवाईची महापालिका प्रशासाने लागलीच दखल घेऊन त्या त्या भागात कडक उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे.