जलप्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य पिशव्यांचे वाटप

गणेशोत्सवानिमित्त शिवयुवा प्रतिष्ठानचा उपक्रम
जलप्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य पिशव्यांचे वाटप

दे. कॅम्प ।वार्ताहर Devlali Camp

दारणा नदी Darna River स्वच्छता व पर्यावरण या ध्येयाने प्रेरित होऊन विविध उपक्रम राबविणार्‍या येथील शिवयुवा प्रतिष्ठानतर्फे Shiv Yuva Pratishthan गणेशोत्सवानिमित्त Ganesh Festival सलग पाचव्या वर्षी निर्माल्य पिशवी वाटप अभियान Nirmalya Bags Distribution Campaign सुरू करण्यात आले. यावर्षी शहरातील शाळांसह, गणेशोत्सव मंडळाना निर्माल्य पिशव्यांचे वाटप करण्यात आले असून याची सुरूवात शिगवे बहुला येथील जि.प. शाळा व शारदा स्टॅण्ड येथील गणेशोत्सव मंडळपासून करण्यात आली.

गणेशमूर्ती विसर्जनवेळी भाविकांकडून निर्माल्य नदीत टाकले जाते. त्यामुळे जल प्रदूषणात भर पडून दारणा नदी स्वच्छतेस बाधा येते. दारणा नदीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी शिवयुवा प्रतिष्ठानकडून प्रयत्न करण्यात येत असून गणेशोत्सवात निर्माल्य पिशव्यांचे वाटप हा त्याचाच एक भाग होय. मंडाळांना व गणेशभक्तांना प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य पिशव्यांचे वाटप अध्यक्ष प्रमोद मोजाड यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण आणि जलप्रदूषण रोखण्यासंदर्भात जागरूकता निर्माण व्हावी, दारणानदी प्रदूषित होत असल्याने त्याचे कोणते दुष्परिणाम उदभवतात याची जाणीव व्हावी, हा या उपक्रमाचा हेतू आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत साचलेले निर्माल्य या पिशवीत टाकून विसर्जनाच्या दिवशी नदीवरील निर्माल्य संकलन केंद्र व देवळाली कॅन्टोमेंट छावणी परिषेदेच्या संकलन ठिकाणी पिशव्या जमा कराव्यात, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत कासार, भिकाजी डांगे, विलास वावरे, रघुनाथ मोंढे, रामदास बेरड, जयराम झोंबाड, आण्णासाहेब मोंढे, बाळासाहेब बेरड, विनोद डांगे, आनंद वैरागर, सुरेश गुळवे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका कल्पना साळवे यांनीही विद्यार्थ्यांना जलप्रदूषणापासून होणार्‍या हानीची माहिती दिली. यावेळी शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरज भोर यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com