
नाशिक । प्रतिनिधी Nashik
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणा मंत्रालयाच्या Union Ministry of Social Justice and Empowerment राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्कार- २०२० National Disability Empowerment Award वितरण सोहळयात नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद President Ramnath Kovind यांच्या हस्ते व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार देण्यात आला. कार्यकारी अभियंता सिध्दार्थ तांबे Executive Engineer Siddharth Tambeयांनी पुरस्कार स्विकारला.
दिल्लीतील विज्ञान भवन येथे शुक्रवारी (दि.३) वितरण सोहळा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणा मंत्रालयाच्या राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्कार- २०२० वितरण सोहळा पार पडला. 'सुगम्य भारत योजने'च्या अंमलबजावणीत नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग अव्वल ठरले आहे. दिव्यांगांसाठी बॅरिअर फ्री इन्व्हॉयर्नमेंट फॉर द पर्सन्स विथ डीसबिलिटीजसाठी उत्कृष्ठ कामासाठी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचा राष्ट्रीय पुरस्कार-२०२० नाशिक पीडब्ल्यूडीची निवड झाली.
कार्यकारी अभियंता सिध्दार्थ तांबे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. कार्यकारी अभियंता तांबे व सहाय्यत अभियंता अभिजीत शेलार यांनी दिव्यागांसाठी बॅरिअर फ्री एन्व्हायर्नमेंट फॉर द पर्सन्स विथ डिसअॅबिलिटीज ची निर्मिती केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वाहनतळापासून मुख्य इमारत तसेच इमारतीच्या आवारात दिव्यांगाना मुक्त विहार करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यासाठी तीन कोटींचा खर्च आला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील पांडवलेणीच्या पायथ्या असलेल्या दादासाहेब फाळके स्मारकात उभारलेल्या अपंगस्नेही सुविधांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दरम्यान, मुळाचा नाशिकचा पण सध्या बंगोलरमध्ये वास्तव्यास असलेल्या अभिषेक बघेल यांना दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी किबो एक्सएस मशीनचे संशोधन केल्याबद्दल राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.