'नाशिकरोडरत्न' पुरस्कारांचे वितरण

दै. 'देशदूत'चे नाशिकरोड प्रतिनिधी दिगंबर शहाणे यांचा गौरव
'नाशिकरोडरत्न' पुरस्कारांचे वितरण

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ( Indian Medical Association ) वतीने 'नाशिकरोडरत्न पुरस्कारांचे' ( Nashikroad Ratna Puraskar )वितरण करण्यात आले. यामध्ये दैनिक 'देशदूत'चे नाशिकरोड प्रतिनिधी दिगंबर शहाणे यांनाही 'नाशिकरोडरत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.

शिक्षण, क्रीडा, उद्योग, पत्रकारिता, योगा, वैद्यकीय, साहित्य आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांना मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्र्यंबकराव गायकवाड यांना जीवनगौरव तर माजी नगरसेवक जगदीश पवार यांना कोविडयोद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अन्य पुरस्कारार्थी- डॉ. विलास गुजराथी (वैद्यकीय), अशोक तापडीया व प्रशांत कापसे (सामाजिक), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे (पोलिस), अश्विनी देवरे (क्रीडा), डॉ.महेश करंदीकर (अध्यापन), राजश्री मालपुरे (योगा), तृप्ती पाराशर (क्रीडा मार्गदर्शक), तन्वी अमित (साहित्य), डॉ. मोनालिसा जैन, प्रि. रिचा पेखळे, सुनीता थामस, चारुशीला पत्की, पवन जोशी, वृषाली राजे, लता गुंजाळ यांना शिक्षणसेवेबद्दल गौरविण्यात आले.

उत्कृष्ट संस्था पुरस्कार नाशिकरोड देवळाली सहकारी बँक आणि कॅटा फार्मा कंपनी यांना प्रदान करण्यात आला. बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड आणि निवृत्ती अरिंगळे यांनी तर कॅटा फार्माच्या पदाधिकारी डॉ. श्वेता करवा, इंदुताई बियाणी, प्रवीण मारावळ यांनी तो स्वीकारला. व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, सचिव डॉ. रेश्मा घोडेराव, खजिनदार सारंग दराडे उपस्थित होते.

याप्रसंगी मनपा आयुक्त पुलकुंडवार म्हणाले की, इंडियन मेडिकल असोसिएशनचे कार्य प्रशंसनीय आहे. रुग्णांना सेवा देतानाच समाजासाठी योगदान देणार्‍यांचा सत्कार ही चांगली बाब आहे. डॉक्टरांनी कोविड काळात महत्वाचे काम केले. मनीषा तनुपरे, डॉ. सुचेता गंधे, डॉ. श्वेता भिडे यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी डॉ. विनीत वानखेडे व आहारतज्ज्ञ डॉ. क्षितीजा गायकवाड यांचे व्याख्यान झाले. डॉ. प्रशांत भुतडा यांनी प्रास्ताविक तर डॉ. रेश्मा घोडेराव यांनी आभार मानले. संघटनेच्या उपाध्यक्ष डॉ. संगीता कातोरे, उपसचिव डॉ. मानसी गुजराथी, डॉ. विनोदन कोमावार, डॉ. मंगला राजदरकर, डॉ. वसंत सहस्त्रबुध्दे, डॉ. विजय कराडे, डॉ. कैलास मोगल, डॉ. मानसी पाटील, श्रध्दा अजमेरा, डॉ. शीतल जाधव, डॉ. प्रशांत मुठाळ, डॉ. सुशील पारख, अर्पिता प्रसाद, डॉ. कांचन लोकवाणी, महेश कलंत्री, विजय सुराणा, डॉ. दिपाली पाटोळे, श्रध्दा अजमेरा, शशीकांत चव्हाण, भीमराज निकम, भारती खरोटे, अचल राजे आदींसह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com