मनपाच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे उद्या वितरण

मनपाच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे उद्या वितरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका (NMC ) शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक 2022-23 वर्षाकरीता उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची निवड जाहिर करण्यात आली होती, तर त्याचा वितरण सोहळा मंगळवारी (दि.13) रोजी दुपारी साडेबारा वाजता शालिमार येथील कालिदास कला मंदिर या ठिकाणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग डॉ. भाऊसाहेब चव्हाण, शिक्षण तज्ञ सचिन जोशी यांच्यासह केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागाला प्रस्तावाची छाननी करून मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल, स्थानिक सहभागातून उपक्रम सामाजिक कार्य , वैशिष्ट पूर्ण उपक्रम ,गुणवत्ता, विकासात संबधित वर्गाचे कामकाज, चाचणीचे निकाल गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न,वर्ग पातळीवरील उपक्रम,नवोपक्रम,कृति संशोधन, शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परिक्षा, विज्ञान प्रदर्शन व सहभाग,

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेले प्रयत्न,राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग, कोविड -19 काळातील उपक्रम विद्यार्थीथी, शिक्षक ऑन लाईन शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केलेले प्रयत्न , स्वत:ची कार्यक्षमता टिकवून ठेवणे करिता केलेले प्रयत्न,उपक्रम व घेतलेले प्रशिक्षण लोक सहभागातून मिळविलेले साहित्य प्रकाशित लेख,पुस्तके,शोधनिबंध, प्रबंध, हस्तलिखिते या सर्व निकषांचा अभ्यास करुन निवड करण्यात आली आहे, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

प्राप्त शिक्षक प्रस्तावानुसार व शासनाच्या सुचनेनुसार गठीत केलेल्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मनपा प्राथमिक विभागातून 6 व खाजगी प्राथमिक शाळा 4 असे एकूण 10 शिक्षकांची उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार करीता निवड करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com