नाशिक । Nashik

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या पात्र लाभार्थ्याना जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती आर्कि. अश्विनि आहेर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, आरोग्याचा वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या माझी कन्या भाग्यश्री योजनेत १ ऑगस्ट २०१६ पासुन सुधारणा करण्यात आली आहे.

या योजनेत नांदगाव तालुक्यातील माळेगाव क. येथील डगळे दाम्पत्यांचे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाकडे अर्ज प्राप्त झाला होता. त्यानुसार त्यांच्या मुलीच्या नावे २५००० रुपये रक्कम बँक ऑफ़ महाराष्ट्र येथे मुदत ठेवीत ठेवण्यात आले.

त्याचे प्रमाणपत्र सभापती महिला व बालकल्याण आर्कि. अश्विनि आहेर यांच्या हस्ते डगळे दाम्पत्यास देण्यात आले. राज्यात एप्रिल २०१६ पासुन माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील तसेच साडे सात लाखांपर्यंत उत्पन्न आसणाऱ्या उत्पन्न घटकातील कुटूंब अर्ज करु शकतात.

या योजनेंतर्गत एका मुलीवर माता किंवा पित्याने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून मुलीच्या नावे पन्नास हजार तर दोन मुलीनंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलींच्या नावे शासनाकडून प्रत्येकी पंचवीस हजार बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवले जातात.

नांदगाव तालुक्यातील जास्तीत जास्त कुटुंबानी या योजनेचा लाभ घेण्यासाठी गावातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा,असे आवाहन सभापती आर्कि.अश्विनि आहेर यांनी केले आहे.