
नाशिक | प्रतिनिधी
भारतात १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. हा दिवस देशातील महान चिकित्सक आणि प.बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉयच्या आठवणीत साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून इंडियन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे डॉ. युवराज पवार, डॉ. पूनम शिवदे, डॉ. यतींद्र दुबे, डॉ. अभय सुखात्मे, डॉ. तुषार देवरे, डॉ. संजय वेखंडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
या जीवनगौरव पुरस्काराचे वितरण १ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ८:३० वाजता, डॉ. ह.स.जोशी सभागृह, शालिमार, नाशिक येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ, सचिव डॉ. माधवी गोरे-मुठाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, खासदार डॉ. भारती पवार तसेच आयएमए महाराष्ट्राचे नियोजित अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी आयएमए च्या वतीने डॉ. युवराज पवार, डॉ. पूनम शिवदे, डॉ. यतींद्र दुबे, डॉ. अभय सुखात्मे, डॉ. तुषार देवरे, डॉ. संजय वेखंडे यांचा जीवनगौरव पुरस्कार देउन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त डॉक्टरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वयक डॉ. प्रेरणा शिंदे, डॉ. शलाका बागुल, डॉ. मृगाक्षी क्षीरसागर यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयएमए चे खजिनदार डॉ पंकज भट, उपाध्यक्ष डॉ मनीषा जगताप, सह सचिव डॉ सागर भालेराव, डॉ मिलिंद भराडीया परिश्रम घेत आहेत.