जीवनगौरव, गोदागौरव पुरस्कारांचे आज वितरण

जीवनगौरव, गोदागौरव पुरस्कारांचे आज वितरण
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राष्ट्रसंत श्री संत गाडगे महाराज Rashtrasant Shri Saint Gadge Maharaj यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्याचे अनुयायी ज्येष्ठ समाजसेवक कै. निवृत्तीराव दादाजी बर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री राजे छत्रपती सामाजिक, शैक्षणिक संस्था व श्री संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने समाजसेवक स्व. शंकरराव बर्वे सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय कर्मयोगी श्री. संत गाडगे महाराज जीवनगौरव Sai nt Gadge Maharaj Jeevan Gaurav Award व कर्मवीर निवृत्ती दादा बर्वे गोदागौरव पुरस्काराचे Karmaveer Nivruti Dada Barve Godagaurav Award वितरण श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते सोमवारी (दि.22) सायंकाळी पाचला कालिदास कला मंदिर येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश बर्वे यांनी दिली.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानसभा हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ असून प्रमुख अतिथी पालकमंत्री छगन भुजबळ, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी मंत्री बबन घोलप, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, खा. हेमंत गोडसे, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आ. डॉ. सुधीर तांबे, महंत भक्तिचरणदास, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापौर सतीश कुलकर्णी, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, उपसचिव सिध्देश शिंदे, शिवसेना नेते सुनील बागुल, दत्ता गायकवाड, करण गायकर उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com