वृक्षसंवर्धन करण्यासाठी सिंचन साहित्य वितरण

वृक्षसंवर्धन करण्यासाठी सिंचन साहित्य वितरण

सिन्नर । वार्ताहर sinnar

माळेगाव ( Malegaon - Sinnar ) येथील कृषी साहित्य उत्पादन करणार्‍या कंपनीच्या वतीने वनप्रस्थ फाऊंडेशनला ( Vanaprastha Foundation ) वृक्षसंवर्धनासाठी ठिबक सिंचन नळी, इतर साहित्य वितरित करण्यात आले.

वनप्रस्थ फाऊंडेशन गेल्या चार वर्षांपासून वृक्षारोपण व संवर्धनाचे काम करत असून नुकतेच संस्थेच्या वतीने रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. ऐन जुलै महिन्याच्या मध्यावधीत देखील पावसाने ओढ दिल्यामुळे संस्थेचे स्वयंसेवक नियमितपणे नळीच्या सहाय्याने या नवीन लावलेल्या रोपट्यांना पाणी देत आहेत. ही बाब माळेगाव औद्योगिक वसाहतीतील प्रगती इंडस्ट्रीज व प्रगती ऍग्रोटेक या कंपनीचे संचालक नंदकुमार पाटील यांना समजली.

त्यांनी संस्थेचे स्वयंसेवक दत्तात्रय बोर्‍हाडे यांच्याशी संपर्क साधून वृक्षांना पाणी देणे सोपे व्हावे, यासाठी ठिबक नळ्यांचे बंडल, रेन पाईप, मल्चिंग पेपर असे सुमारे 50 हजार रुपयांचे साहित्य संस्थेच्या स्वयंसेवकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच यापुढे देखील कोणत्याही प्रकारच्या साहित्याची आवश्यकता असल्यास निसंकोच संपर्क साधावा, असे आवाहन देखील यावेळी पाटील व ज्ञानेश्वर गवते यांनी केले. यावेळी राजाभाऊ क्षत्रिय, डॉ. महावीर खिंवसरा, अनिल जाधव उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com