आशा सेविकांना विमा पॉलिसी वितरण
नाशिक

आशा सेविकांना विमा पॉलिसी वितरण

नगरसेविका संगीता गायकवाड यांची दखल

Abhay Puntambekar

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

महापालिका शिक्षण मंडळाच्या सभापती व प्रभाग क्रमांक २० च्या नगरसेविका संगीता गायकवाड यांनी आपल्या स्वखर्चातून करोनाकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणार्‍या आशासेविका यांचा प्रत्येकी तीन लाख रुपयांचा विमा उतरविला असून त्या पॉलिसीचे प्रमाणपत्र नुकतेच आशासेविकांना देण्यात आले.

गेल्या चार ते पाच महिन्यापासून नाशिकरोड परिसरात करोनाकाळात आशासेविका घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. तसेच कोणत्या घरात गेल्यावर त्यांना कोण व्यक्ती पॉझिटिव्ह आहे किंवा नाही हे माहिती नसते. तरीपण आपला जीव धोक्यात घालून घरातील प्रत्येक नागरिकांची तपासणी करतात. मात्र या आशासेविका यांची शासनाने अद्यापही विमा पॉलिसी उतरविली नाही.

नगरसेविका संगीता गायकवाड यांनी दखल घेऊन बिटको सेंटरमधील आठ आशासेविका यांचा विमा कवच उतरविला आहे. त्यांनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यांचा आदर्श इतरांनी घ्यावा अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. संबंधित आशावर्कर यांना विमा कवच प्रमाणपत्र देण्यात आले. त्याप्रसंगी भाजपा नाशिकरोड मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड, योगेश भगत, उदय थोरात, विजय तळेगावकर, राजेश आढाव, राम वाघ आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com