दूचाकी विक्रीवर निकृष्ठ हेल्मेट वाटप; चालकांचा शोरुमविरुद्धात संताप

दूचाकी विक्रीवर निकृष्ठ हेल्मेट वाटप; चालकांचा शोरुमविरुद्धात संताप

सिन्नर। अमोल निरगुडे | Sinnar

नवीन दुचाकी खरेदी करत असताना त्यासोबत 2 नवीन हेल्मेट (Helmet) घेणेही बंधनकारक असल्याने सध्या शोरुम (Showroom) चालकांकडून निकृष्ठ दर्जाचे हेल्मेट (Inferior helmet) देऊन ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे समोर येत आहे. यामुळे नवीन दुचाकी (New bike) खरेदी करणार्‍यांकडून शोरुम चालकांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कुठल्याही कंपनीची दुचाकी खरेदी करताना शोरुम चालकांकडून 2 हेल्मेट खरेदी करणे बंधनकारक केले आहे. त्याशिवाय अनेक कंपनीचे शोरुम चालक दुचाकी देत नसल्याचे समोर येत आहे. आज (दि. 2) गुढी पाडव्याच्या (Gudi Padva) मुर्हुर्तावर सर्वच कंपनींच्या शोरुममध्ये दुचाकी खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. मात्र, यावेळी अनेक ग्राहकांकडून दुचाकीबरोबर देण्यात येणार्‍या या हेल्मेटच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले.

दुचाकीबरोबर देण्यात येणारे हेल्मेट हे अतिशय निकृष्ठ असून एका हातानेही हेल्मेटवर दाब दिल्यास ते वाकले जात आहे. हेल्मेटवर आय. एस. आय. मार्क (ISI mark) असलेले चिन्ह असले तरी त्यांच्या दर्जावरून हे हेल्मेट दुचाकीधारकांच्या कितपत उपयोगात पडेल असा प्रश्न दुचाकी खरेदी करणार्‍यांसह त्यांच्याबरोबर येणार्‍या नातेवाईकांना पडत असल्याने ते हेल्मेट घेण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

मात्र, काही शोरुम चालकांकडून हेल्मेट घेणे बंधनकारक असल्याचे कारण पुढे करत असे निकृष्ट दर्जाचे हेल्मेट (Inferior helmet) ग्राहकांच्या माथी मारुन त्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे दिसत आहे. त्यामुळे परिवहन विभागाने (Department of Transportation) लक्ष देऊन ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करता चांगल्या दर्जाचे हेल्मेट देण्यासाठी सर्व शोरुम चालकांना भाग पाडावे अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

...तर डोक्याचा चुरा दुचाकीबरोबर मिळणारे हेल्मेट आय. एस. आय. मार्कचे जरी दिसत असले तरी ते डुप्लिकेट किंवा एकदमच निकृष्ठ दर्जाचे आहे. एखादा अपघात झाल्यास हे हेल्मेट वापरणार्‍याच्या डोक्याला मार लागल्यास हेल्मेटसह डोक्याचा चुरा होऊ शकतो. असेच हे हेल्मेट दिसत आहे. त्यामुळे शोरुम चालकांकडून ग्राहकांच्या जीवाशी एकप्रकारे खेळच सुरु आहे.

- सागर बैरागी, ग्राहक

Related Stories

No stories found.