सप्तशृंगीगडावरील नागरिकांना किराणा वस्तूंचे वाटप

सप्तशृंगीगडावरील नागरिकांना किराणा वस्तूंचे वाटप

नांदुरी | Nanduri

सप्तशृंग गडावर गेल्या वर्षेभरापासुन करोनाच्या या संकटामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे.

दरम्यान मागील वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यवसाय बंद आहेत. येथील रहिवाशांना व्यवसायाशिवाय इतर कुठलाही जोडधंदा नसल्याने आर्थिक फटका बसला आहे.

त्यातच सरकारने आता पुन्हा एकदा महिना अखेर पर्यंत लाॕकडाऊन वाढवल्याने अजुन किती दिवस या संकटाचा सामना करावा लागणार? असा प्रश्न स्थानिकांना सतावत आहे.

मुंबई-नाशिक येथील काही सामाजिक व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मदतीने गडवासीयांना काही हातभार लागावा यासाठी अन्न धान्यासह किराणा मालाची मदत होत आहे.

काँग्रेसचे युवा नेते मयुर बेनके यांच्या सह त्यांचे मित्र कल्याण महानगर पालिकेचे नगरसेवक कुणाल पाटील, प्रितेश शहा, दिगबंर ईसलकर यांनी प्रत्येकी 100 किट प्रमाणे 400 किटचे वाटप गुरुदेव आश्रमात गराजुंना वाटप केले. यात बाजरी, तेल, शेंगदाणे, मिठ, मिरचीपूड, हळद, साबन पोहे आदी वस्तूची वाटप केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com