लोककला जपणाऱ्या पन्नास कलावंतांना शिधापाणी

व्हिडीओ व्हॉलेन्टिअरचा उपक्रम
लोककला जपणाऱ्या पन्नास कलावंतांना शिधापाणी

नाशिक | Nashik

पेठ (Peth Taluka) तालुक्यातील कडवईपाडा येथील ५० लोकलावंतांना (Folk artist) व्हिडीओ व्हॉलेंटीअरच्या (Video Volunteers) माध्यमातून तसेच नाशिकच्या समुदाय पत्रकार मायाताई खोडवे (Mayatai Khodwe) यांच्या प्रयत्नातून किराणा वाटप करण्यात आला.

ग्रामीण भागातील जुन्या जाणत्या परंपरागत लोककला (Folk Art) जोपासणाऱ्या कलावंतांचा करोना काळात रोजगार (Employment) गेला. तसेच मोठ्या प्रतिकूल परीस्थितीत हे लोककलावंत जीवन जगत होते. त्यांना या अडचणीत साहाय्य व्हावे, यासाठी फुल ना फुलांची पाकळी म्हणून ही मदत करण्यात आली.

करोनाच्या काळात अनेकांचा रोजगार गेला. यातून कलावंतही सुटले नाहीत. त्रंबकेश्वर (Trimbakeshwer), पेठ (Peth) तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात (Tribal Area) हजारो लोककलावंत आहेत. यात कलगी-तुरा, पावरी वादक, नाच्या, झिलक्या, कणाती कार, गावठी तमाशा, बोहाडे (Bohada) अशा धार्मिक कार्यक्रमांवर बंधने आली. या पारंपरिक लोककला (Traditional Folk Art) जपणारे करोना काळात घरी बसून आहेत. त्यांना हातभार मिळावा यासाठी किराणा वाटप (Glosery Distribute) करण्यात आला.

या प्रसंगी जर्नलिष्ठ ऍक्टिव्हिजम फोरमचे प्रवर्तक आनंद पगारे, जिल्हा ग्रामविकास संवाद मंचचे समन्वयक राम खुर्दळ, शिवकार्य गडकोटचे दुर्गसंवर्धक विष्णू खैरनार, जगदीश महाराज जाधव यासह लोककलावन्त यावेळी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com