रेशन दुकानातून मे महिन्याचे धान्य वितरण सुरू

रेशन दुकानातून मे महिन्याचे धान्य वितरण सुरू

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात येत्या १५ मे पर्यंत लाॅकडाऊन जारी आहे. या कालावधीत मुख्यमंत्री यांनी आर्थिक सहायत्ता अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मे महिन्यात सवलतीच्या दराने एक महिन्याचे अन्नधान्य दिले जाणार आहे.

त्यानूसार मे महिन्यासाठी रास्त भाव दुकानांमध्ये धान्य पुरवठा करण्यात आलेला आहे. नाशिक महागरपालिका क्षेत्रातील सर्व अंत्योदय व प्राधान्य कुटूंब पात्र लाभार्थ्यांनी रास्त भाव दुकानातून धान्य प्राप्त करून घेण्याचे आवाहन धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटाळे यांनी केले आहे.

सवलातीच्या दराने अन्नध्यान्य मिळण्यास पात्र असलेल्या लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी यांना मे या एका महिन्यासाठी प्रति कार्ड ३५ किलो धान्य व प्राधान्य कुटूंब लाभार्थी यांना प्रति व्यक्ती ५ किलो गहु, तांदूळ मोफत मिळणार आहे. याचप्रमाणे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम पात्र लाभार्थी यांना मे व जून या कालावधीत प्रति व्यक्ती ३ किलो गहु व २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो व प्रति कार्ड १ किलो चणाडाळ मोफत दिले जाणार आहे.

तरी सर्व पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी यांनी नेमून दिलेल्या रास्त भाव दुकानातून धान्य घेऊन त्याची नियमित पावती प्राप्त करून घ्यावी. यासाठी कोणतीही रक्कम अदा करू नये. धान्य वितरणाबाबत काही तक्रार असल्यास शासनाने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अथवा संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्यात यावे असे आवाहन धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटोळे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com