आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना निधींंचे वितरण

आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना निधींंचे वितरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील आदिवासीबहुल नऊ तालुक्यांतील ( Tribal Talukas ) 575 ग्रामपंचायतींना ( Grampanchayats ) आदिवासी उपयोजनेंतर्गत विकासकामांसाठी ( Development Works ) जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन 2021-2022 अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिकद्वारा (Tribal Development Project by Nashik )जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्याकडील निधी वितरण ( Distribution of Funds) आदेशानुसार एकत्रित प्राप्त निधी 55 कोटी 86 लक्ष 20 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या प्रमाणात निधी थेट पेसा ग्रामपंचायतींना वितरीत करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

नाशिक जिल्ह्यातल्या अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना पाच टक्के अबंध निधी योजनेचा निधी 24 मार्च 2022 रोजी थेट ग्रामपंचायतींना वितरीत होत असून यामुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील विकासकामांना गती मिळणार आहे. जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण, देवळा या नऊ तालुक्यांतील 575 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असून 1479 गावांना या निधीचा लाभ होणार आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामपंचायतींच्या खात्यात झेडपी एफएमएस प्रणालीद्वारे थेट निधीचे वितरण हे केले गेले आहे. हा निधी संबंधित ग्रामपंचायतीने त्या अंतर्गत येणारे गाव, वस्ती, वाडी, पाडा यांच्या अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च करावा. तसेच उपलब्ध करून देण्यात आलेला निधी बाबनिहाय खर्च करताना

अ) पायाभूत सुविधा

ब) वनहक्क अधिनियम (ऋठ) व पेसा कायद्याची अमंलबजावणी

क) आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व

ड) वनीकरण, वन्यजीव संवर्धन, जलसंधारण, वनतळी, वन्यजीव पर्यटन व वन उपजीविका या बाबींकरता प्रत्येकी 1/4 या प्रमाणात विनियोगात आणावा, असे शासन आदेश आहेत.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी याबाबत माहिती दिली असून संपूर्ण निधीचा योग्य विनियोग कसा होईल याबाबत नियोजन करण्याचे आदेश पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना निर्गमित केले आहेत.

पायाभूत विकासकामांना गती द्यावी

पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना प्राप्त होणारा निधी हा आदिवासी जनतेच्या कल्याणाकरता खर्च करण्यात येईल. याबाबत ग्रामपंचायतींनी योग्य ती खबरदारी घेऊन नियोजन करावे व पेसा ग्रामपंचायतीने त्याअंतर्गत येणार्‍या पेसा गावांच्या 2011 च्या जनगणनेतील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येनुसार त्या प्रमाणात हा निधी खर्च करत या भागातील पायाभूत विकासकामांना गती द्यावी, असे आदेश ग्रामपंचायत विभागास देण्यात आले आहेत.

लीना बनसोड, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक

Leena Bansod, Administrator and Chief Executive Officer, Z.P. Nashik

Related Stories

No stories found.