महिला बचत गटांना फळझाडांचे वाटप

महिला बचत गटांना फळझाडांचे वाटप

नांदुरी । वार्ताहर Nanduri

कळवण ( Kalwan ) तालुक्यातील नांदुरी येथील निसर्ग सौजन्य ग्रुप व कळवण पोलिस ठाणे यांच्या संयुक्तपणे कातळगाव येथील ‘उमेद’ च्या बचत गटांना एक हजार फळझाडांची वाटप करण्यात आली.

प्रमुख पाहुणे म्हणून कळवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ, सरपंच सुभाष राऊत, ग्रा. पं. सदस्य किरण आहिरे , शिवसेनेचे जिल्हा नेते गिरिष गवळी, चालता बोलता मदत केंद्रांचे अध्यक्ष संदिप बेनके, निसर्ग सौजन गृ्रपचे सर्वेसर्वा पोलिस नाईक योगेश गवळी, पोलिस कोशारे, अशोक ब्राम्हणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामपंचायत सदस्या भोये यांनी केले. यावेळी कातळगाव येथील 9 बचत गटांना एक हजार फळझाडे वाटप करण्यात आले. यात सिताफळ, पेरु व चिंच यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बचत गटाचे प्रमुख कल्पना जाधव, छाया चव्हाण, भारती चव्हाण, जयश्री जोपळे, अलका गवळी, रत्ना खांडवी यांच्यासह बचत गटातील सर्व सदस्या उपस्थित होत्या.

यावेळी प्रमोद वाघ यांनी वृक्षलागवडीचे महत्व सांगत माहिती दिली. या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरणचे अधिक्षक सहाणे व वनविभागाचे अधिकारी पाटील यांचे महत्त्वाचे योगदान असल्याने हा उपक्रम नांदुरी औटपोस्टात येणार्‍या सर्व गावाना राबवणार असल्याचे योगेश गवळी यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com