स्वयंरोजगारांसाठी अर्थसहाय्य धनादेश वितरण

स्वयंरोजगारांसाठी अर्थसहाय्य धनादेश वितरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

त्र्यंंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar taluka) आदिवासी (Tribal area) भागातील गरजू लाभार्थ्यांना शबरी आदिवासी वित्त व विकास विभागामार्फत (Shabari Tribal Finance and Development Department) स्वयंरोजगारासाठी कर्ज पुरवठा करण्यात आला.

आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar), संपतराव सकाळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश प्रदान (Provide checks) करण्यात आले, अशी माहिती शाखा व्यवस्थापक मोनाली शिंदे यांनी दिली.

यावेळी पहिल्या टप्प्यात महेंद्र पवार गॅरेज (Garage) सुरू करण्यासाठी, तुकाराम भोये यांना किराणा दुकानासाठी तर सुभाष अमृता बुधार यांना राईस मिल व्यवसाय (Rice mill business) करण्यासाठी धनादेश प्रदान करण्यात आले.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत पुरस्कृत मुदत कर्ज योजने (Loan scheme) अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार (Educated unemployed) लाभार्थ्यांना त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने स्वयंरोजगारासाठी अल्प व्याज दराने कर्ज पुरवठा केला जातो. महिला सबलीकरण योजना (Women Empowerment Scheme) अंतर्गत योजनांची माहिती शिंदे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com