शेतकर्‍यांना बांधावर खत वाटप

कृषी विभागाच्या योजनेचा भुसे यांच्या हस्ते सुरुवात
शेतकर्‍यांना बांधावर खत वाटप

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शेतकरी (farmers) बांधवांनी एकाचवेळी बांधावर खते (Fertilizers), बियाणे (seeds) व कीटकनाशके (Pesticides) उपलब्ध होण्यासाठी शेतकर्‍यांनी गांवातील शेतकरी बचत गट व विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये (Executive Co-operative Societies) मागणी नोंदवावी, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी केले आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात कृषी विभाग (Department of Agriculture) व आरसीएफ कंपनीच्या (RCF Company) वतीने राज्यात शेतकरी बांधवांना एकत्रीतपणे बांधावर खते वाटपाचा शुभारंभ ना. भुसे यांच्या हस्ते झाला. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले, सध्या शेतीविषयक परिस्थिती कठीण असली तरी शेतकरी (farmers) अतिशय परिश्रमपूर्वक काम करीत आहेत. त्यासाठी त्यांना खते, बियाणे, कीटकनाशके व निविष्ठांची आवश्यकता असते.

शेतकरी बांधवांनी एकत्रितपणे खते, बियाणे व कीटकनाशकांची खरेदी केली तर त्यांना ते शेताच्या बांधावर एकाचवेळी उपलब्ध केले जाईल. त्याचा फायदा सर्वांना होईल. यास्तव शेतकरी बांधवांनी बचतगट व विविध कार्यकारी सहकारी संस्थाकडे आपली मागणी नोंदविणे आवश्यक आहे. त्यानुसार कृषि विभागांतर्गत खतांचा पुरवठा करणार्‍या कंपनीकडून पुरेशा प्रमाणावर साठा उपलब्ध करून देता येईल. त्या अनुषंगाने शेतकर्‍यांनी मागणी नोंदविल्यास (Demand Register) कृषी विभागाने खते, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत, अशा सुचना ना. भुसे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

शेतकरी बांधवांनी खते वापरतांना शेतीच्या मातीचा नमुना (Soil sample) तपासून जमीन आरोग्यपत्रिका तयार करावी. ही पत्रिका तयार केल्यानंतर आवश्यकतेनुसार खतांचा वापर करावा. जैविक खतांचा वापर केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांना मदत होणार आहे. तसेच इतर सेंद्रिय खते, जैविक खतांचा वापर केल्याने रासायनिक खतांच्या तुलनेत दहा टक्के बचतही होणार आहे.

यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांना सर्व खतांचे महत्त्व पटवून द्यावे, असेही ना. भुसे यांनी शेवटी सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, भास्कर जाधव, पं.स. कृषी अधिकारी संदीप पवार, मंडळ कृषी अधिकारी भाऊसाहेब आढाव, संदीप गलांडे, राहुल जाधव, दीपक मालपुरे, भगवान मालपुरे, आरसीएफ कंपनीचे विपणन अधिकारी बजरंग कापसे, विशाल सोनवलकर, शेतीनिष्ठ शेतकरी विनोद जाधव, मनोहर बच्छाव आदिंसह इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com