
चिंचदर | वार्ताहर Chinchdar
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचदर (Zilla Parishad Primary School Chinchdar )येथील शिक्षक कैलास भटू बच्छाव आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातरवेल येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका ऊर्मिला बाबूलाल पिंपळे या दाम्पत्याकडून महात्मा जोतिराव फ़ुले यांच्या जयंती ( Mahatma Phule Jayanti ) निमित्त जिल्हा परिषद चिंचदर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही पेन वाटप करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
शिक्षकांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले तसेच बच्छाव दाम्पत्य हे शैक्षणिक सामजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ग्रामस्थांनी कौतुक केले. शिक्षक भामरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केले.