महिंद्रा यश फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य व धान्य वाटप
नाशिक

महिंद्रा यश फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य व धान्य वाटप

एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्यक्रम

Ravindra Kedia

Ravindra Kedia

सातपूर | प्रतिनिधी Satpur

महिंद्रा आणि महिंद्रा लि. नाशिक व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये एच.आय.व्ही., एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्यक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत सहजीवन जगणाऱ्या १२० बालकांच्या घरी जावून पोषण आहार व शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारने टाळेबंदी केली आहे अशा परिस्थितीत शाळा चालू करण्याचे आदेश सरकारने दिलेले नाहीत, मात्र शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण प्रणाली ची सुरुवात केली आहे. महिंद्रा आणि महिंद्रा लि. व यश फाउंडेशन द्वारा १५० सहजीवन जगणाऱ्या मुलांना शालेय साहित्यही वाटप करण्यात आले.

तसेच रवींद्र पाटील व कमलाकर घोंगडे यांनी उत्तीर्ण विद्यार्थी यांना भावी वाटचालीसाठी दिल्या, मुलांनी व त्याच्या पालकांनी आपले आरोग्य सांभाळा , पोषक आहार घ्या , गोळ्याचे सातत्य ठेवा आणि मुलांनी घरी राहून त्यांच्या अभ्यास व्यवस्थित करा अशा काही महत्त्वपूर्ण काळजी वाहक सूचना मान्यवरांनी दिल्यात.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी महिंद्रा आणि महिंद्रा लि. नाशिक चे अधिकारी कमलाकर घोंगडे व यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवरांनी उत्साही सहभाग घेतला.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com