महिलांना ड्रम व्हिलचे वाटप

महिलांना ड्रम व्हिलचे वाटप

खोकरविहीर । वार्ताहर | Khokarvihir- Dindori

रोटरी क्लब नॉर्थ नाशिक (Rotary Club North Nashik) आणि इनर व्हील क्लब ऑफ जेन नेक्स्ट नाशिक (Inner Wheel Club of Gen Next Nashik) संस्थेच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील (peth taluka) कहांडोळपाडा ग्रामपंचायत मधील देवळाचापाडा आणि पिंपळपाडा, पोंडयाचामाळ महिलांना शंभर ड्रम व्हिलचे (drum wheel) वाटप करण्यात आले.

सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून या पाड्यातील महिलांची पाणी समस्या, डोंगर चढून पाणी (water) वाहताना दैनिक देशदूतने (dehdoot) दखल घेतली. हे रोटरी क्लब नॉर्थ नाशिक संस्थेचे अध्यक्ष उमेश राठोड व सचिव गिता पिंगळे, चंदन सोनी, आशिष चांडक आणि इनर व्हिल क्लब नाशिक या संस्थेचे अध्यक्षा सोनल विजयवर्गीया, सचिव रुपल गुजराथी, त्रिरूपती सोनी, दिपाली चांडक यांनी खरी परिस्थितीची देवळाचा पाड्यात व पिंपळपाड्यात येऊन पहाणी केली. वस्तुस्थिती बघितल्यावर गावाने या संस्थेच्या पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी या दोन्हीही संस्थेने या पाड्यात काहीतरी देण्यासाठी महिलांना आश्वासन लागलीच देण्यात आले. यावेळी जलपरिषद मित्र अशोक कर्डेल यांची साथ मिळाली. रोटरी क्लब नॉर्थ नाशिक (Rotary Club North Nashik) व इनर व्हील क्लब (Inner Wheel Club of Gen Next Nashik) या संस्थेला अनेकांचे हातभार लागून निधी (fund) उभा करुन ड्रम व्हिल वाटप (Drum wheel allocation) करण्याचे निश्चित करण्यात आले.

दोन्हीही संस्थेचे पदाधिकारी आणि ड्रम व्हिल पोहचताच गावकरी यांनी संस्थेचे पदाधिकारी यांचे आदिवासी परंपरागत वाद्य ढोल, पावरीने वाजत गाजत स्वागत करण्यात येऊन आलेले पाहुन्याना मंडपात नेऊन विर बिरसा मुंडा (Vir Birsa Munda), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या फोटोचे पूजन करुन जलपरिषद मित्र आणि ग्रामस्थ यांनी संस्थेच्या अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी यांचा गुलाब पुष्प, शाल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी दोन्हीही संस्था अध्यक्ष यांनी या गावासाठी आम्हाला जितकं शक्य होईल तितकं देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देण्यात आले. यावेळी जलपरिषद मित्र परिवार यांच्या कामाचे कौतुक करुन यापुढे दुर्गम गावातील महिलांच्या डोक्यावरील हंड्याचा भार कमी व्हावा यासाठी यासाठी प्रयत्नशील राहणार असे आश्वासन देण्यात आले. जलपरिषद च्या उपक्रमासाठी वृक्ष उपलब्ध करून देणारं आहेत. देवळाचापाडा गीतेश्वर खोटरे वाचनालय जलपरिषद मित्र परिवार बघून शिक्षित मुलांना स्पर्धा परीक्षा पुस्तके उपलब्ध करुन देऊ असे या दोन्हीही संस्थेतर्फे आश्वासन देण्यात आले. यावेळी रोटरी क्लब नॉर्थ नाशिक अध्यक्ष उमेश राठोड व सचिव गिता पिंगळे, चंदन सोनी, आशिष चांडक, इनर व्हिल क्लब नाशिक या संस्थेचे अध्यक्षा सोनल विजयवर्गीया, सचिव रुपल गुजराथी,

त्रिरूपती सोनी, दिपाली चांडक, कृषी अधिकारी अशोक कर्डेल, संतोष गाडर, जलपरिषद मित्र गितेश्वर खोटरे, एकनाथ भोये, दुर्वादास गायकवाड, देविदास कामडी, गौरव कोहंकिरे, मनिषा घांगळे, प्रल्हाद पवार, अशोक गवळी, ग्रामसेवक पावरा, प्राथमिक शिक्षक गायकवाड, शिरोरे, कैलास चिखले, संतोष गाडर, चिंतामण भांगरे, तुळशीराम भांगरे, सुनिल भांगरे, अशोक गवळी, युवराज चिखले, एकनाथ भांगरे, किसन चिखले, अनिल गाडर, अर्चना भांगरे, कुसुम भांगरे, पुष्पा भांगरे, मंगल भांगरे, यशोदा गाडर, द्रौपदा गाडर, निलम भांगरे, वसंतीबाई गाडर आदींसह कहांडोळपाडा, देवळाचापाडा, पिंपळपाडा, पोंडयाचामाळ परिसरातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.