इगतपुरी : आदिवासी कुटुंबाना घरगुती गॅसचे वाटप

वनविभागाच्या पुढाकार
इगतपुरी : आदिवासी कुटुंबाना घरगुती गॅसचे वाटप

घोटी | Ghoti

इगतपुरी तालुक्यातील मानवेढे चिंचलेखैरें व बोरली या आदिवासी वाड्यापाड्यातील आदिवासी कुटुंबियांना शासनाच्या योजनेतून घरगुती गॅसचे वाटप करण्यात आले.

या तीन गावात जवळपास 39 लाभार्थी कुटुंबाना गॅसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. वृक्ष व वनसंपदेचे संरक्षण होऊन आदिवासी कुटुंबाचे आरोग्य टिकून राहील या हेतुने ही योजना राबविण्यात आली.

इगतपुरी येथील राज भारत गॅस च्या प्रयत्नातून एजन्सीचे संचालक राज इनामदार, पप्पू जाधव, गुलाम पटेल, विनायक भागडे यांचे याबाबत सहकार्य लाभले.

इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली, मंडळ अधिकारी पोपटराव डांगे, वनरक्षक के के हिरे, भाग्यश्री देवरे, मंगला धादवड यांच्या माध्यमातून चिंचलेखैरें येथील २३, मानवेढे ७ तर बोरली येथे ९ लाभार्थ्यांना गॅस किटचे वाटप करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com