रिमांड होम येथे दिवाळी फराळ वाटप

रिमांड होम येथे दिवाळी फराळ वाटप
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा नशाबंदी मंच () या सामाजिक संस्थेच्या वतीने रिमांडहोम (Remandhome) येथे दिवाळीनिमित्त (Diwali) फराळाचे वाटप करण्यात आले...

अध्यक्षस्थानी समाजकल्याण विभाग संचालक गं. पां. माने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर अशोक दिवे, डॉ. हेमलता पाटील, वैशाली भोसले, चंदुलाल शहा, डॉ. हेमंत दिक्षीत, प्रकाश पगारे, अविनाश आहेर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अविनाश आहेर यांनी नाशिक जिल्हा नशाबंदी मंच या सामाजिक संस्थेच्यावतीने जे विविध कार्यक्रम रिमांडहोम येथे राबविले जातात त्याबाबतची माहिती उपस्थितांना दिली.

माजी महापौर अशोक दिवे म्हणाले की, आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून नाशिक जिल्हा नशाबंदी मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने रिमांडहोममध्ये विविध कार्यक्रम राबविले जातात. ही संस्था बहुजन समाजात व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार करते ही अभिमानास्पद बाब आहे.

डॉ. हेमलता पाटील, वैशाली भोसले यांनी रिमांडहोम मधील बालकांचे दिवाळी सणानिमित्त औक्षण केले. चंदुलाल शहा यांनी रिमांडहोमच्या वतीने वंचित बालकांसाठी जे विविध उपक्रम राबविले जातात त्यासाठी नाशिक जिल्हा नशाबंदी मंच या सारख्या संस्था पुढाकार घेतात त्यामुळेच या बालकांना वसतिगृहात असतांना देखील कुटूंबात असल्याचा आनंद मिळतो याचा मला अभिमान आहे, असे सांगितले.

प्रास्ताविक सुरेश पवार, सूत्रसंचालन सनी खरे, आभार राजाभाऊ कानडे यांनी मानले. पाहुण्यांचा सत्कार रंजना नेरकर, रेखा शेलार, छाया बिडलॉन, नमिता मोहाडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी राम ठाकुर, सुर्यकांत आहेर, रेणुका कोकणे, निलिमा साठे, अंजली वैद्य, ज्योती गोसावी, खेमराज नेरकर, सविता आव्हाड, डॉ.शामकुमार दुसाणे, रोहन दुसाणे, सविता खैरनार, अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे, असीफ सैय्यद, सोनाली वारूंगसे, गोकुळ आहेर, सुमन चव्हाण, सुनिता साळवे, निशा ठोसरे, लक्ष्मीकांत निकम, मोहन जगताप, सागर जाधव, शैलेंद्र साळे, सुनंदा मोरे, अंकूश बोरसे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com