नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ हजार ६९१ कोटी विक्रमी पीक कर्ज वाटप झाले आहे.

गतवेळपेक्षा ३९१ कोटींचे अधिक वितरण झाले आहे. जिल्हा बँकेनेही दिलेल्या ४३७ कोटींच्या उद्दीष्टांच्या तुलनेत ३५६ कोटी कर्जाचे वाटप केले आहे.

‘लाखोंचा पोशींदा जगला पाहिजे म्हणजे आपण जगू’ या भूमीकेतून पालकमंत्री भुजबळांनीही प्रत्येक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे आदेश दिले.

सर्व यंत्रणांनी त्यानूसार परिश्रम घेतल्याने जिल्ह्यास ३३०० कोटींच्या उदिष्टापैकी १६९१ कोटींचे कर्ज वितरीत करण्यास यश आले आहे.

यंदा ६५ टक्के इतके कर्जवाटप झाले आहे. जिल्हा बँकेने ३५६ कोटी म्हणजे ८१ टक्के कर्जाचे वितरण केले आहे.

युनियन बँकेने उद्दीष्ठाच्या ८१ टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडियानेही ७७ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्रने ५५ टक्के पीककर्ज वितरीत केले आहे.

सध्याच्या कठीण परिस्थितीत सर्वांनीच एकमेकांना मदत करणे आवश्यक असताना कोटक महिंद्रा या बँकेने २०८ कोंटींच्या उद्दीष्टापैकी अवघे १९ कोटी रुपयांचेच वितरण केल्याने त्यांच्या वरीष्ठांना त्याबाबत पत्र देत कारवाईचा इशारा दिला आहे.

पण एकूणच परिस्थिती पाहाता यंदा आपण ऐतिहासिक ६५ टक्के पीक ककर्जाचे वितरण झाल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.