दुर्गम भागातील विद्यार्थींनींना सायकल

दुर्गम भागातील विद्यार्थींनींना सायकल

सिन्नर | वार्ताहर Sinnar

दापूर परिसरातील करवंददरा वस्ती, बुवाजीबाबा नगर, पालवेवाडी अशा दुर्गम भागातून अनेक विद्यार्थ्यांना (Students) शिक्षणासाठी (Education) मैलोन् मैल पायपीट करीत शाळेत (School) यावे लागत होते. त्यांची गैरसोय लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरच्यावतीने (Rotary Club of Gondeshwar) सात विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वितरण (Delivery of free bicycles) करण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थिनींची शिक्षणासाठीची परवड थांबली आहे.

स्थानिक स्कूल कमिटीचे व्हाईस चेअरमन मोहन काकड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष किरण भंडारी, सचिव सचिन वाघ, माजी अध्यक्ष सोमनाथ वाघ, सतीश नेहे, प्रोजेक्ट सेक्रेटरी सुधीर जोशी, मुख्याध्यापिका जयश्री जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, उपाध्यक्ष अर्जुन आव्हाड, सरपंच रमेश आव्हाड, तंटामुक्ती अध्यक्ष कचू आव्हाड उपस्थित होते.

काकड यांनी समाज विकासाच्या कामात रोटरी क्लबचे (Rotary Club) योगदान मोठे असल्याचे नमूद करून उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापिका जाधव यांनी विद्यालयातील ब आणि क तुकड्या डिजिटल क्लास रूम (Digital class room) करून देण्याची विनंती केली. दुर्गम भागातून पायपीट करीत विद्यार्थींनींना शाळेत यावे लागते. या मुलांना सायकल (Bicycle) उपलब्ध करून देण्यासाठी विद्यालयाने क्लबला साकडे घातले होते.

या मागणीचा विचार करीत 16 पैकी 7 नवीन सायकल पहिल्या टप्प्यात फक्त मुलींसाठी देण्यात आल्या. दुसर्‍या टप्प्यात मुलांसाठी सायकल देण्याची ग्वाही भंडारी यांनी दिली. पर्यवेक्षक एस. जे. गिरी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक ए. बी. सय्यद, सुरेश पावरा यांनी परिश्रम घेतले. कलाशिक्षक राहुल पगारे यांनी सूत्रसंचलन केले. संगीता बाविस्कर यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.