आदर्श शिक्षकरत्न पुरस्कारांचे वितरण

आदर्श शिक्षकरत्न पुरस्कारांचे वितरण

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

उत्तम विद्यार्थी ( Students ) घडविणे हे शिक्षकांचे ( Teachers )काम आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे. पुरस्काराचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केले.

येथील शिवयुवा प्रतिष्ठानसामाजिक संस्थेच्या ( Shivyuva Pratishtan Samajik Sanstha )वतीने शिक्षक दिनानिमित्त 'आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार' सोहळ्याचे आयोजन दर्शन अ‍ॅकॅडमी स्कुलच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून करंजकर बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक उर्मीला शर्मा, हभप गणेश महाराज करंजकर, अशोकराव मोजाड, साहेबराव चौधरी, चंद्रकांत गोडसे, बबनराव चव्हाण आदिंसह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातून प्रतिभा महाजन यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची माहीती दिली.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाश गोसावी, मुक्ता गायकर, प्रतिभा महाजन, संजय बोरसे, रहिम शेख, मोहनसिंग राठोड, आश्विनी लांडे, पोपट खंडीझोड, उषा सैंदाणे, मुकुंद पिसे, रिना गायकवाड, जगदीश धोंडगे, जितेंद्र मानकर, दिपाली जाधव, विजया चतुर, सोनाली शिंदे, बाळकृष्ण जाधव, अनिल कवडे, संग्राम करंजकर, मनिषा गायकवाड, माधवी साळुंखे, किरण पवार, प्रशांत मोरकर, अण्णा विभुते, देवेंद्र नांद्रे आदी शिक्षकांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, फेटा बांधून सन्मान करण्यांत आला. यासाठी शिवयुवा प्रतिष्ठान अध्यक्ष प्रमोद मोजाड, विनोद डांगे, हेमंत गायकवाड, जयदीप निसाळ, तुषार गिते, आकाश बोराडे, किरण भावले, उमेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संतोष फसाटे तर आभार प्रमोद मोजाड यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com