सौंदाण्यात 'आनंदाचा शिधा' वाटप सुरू

सौंदाण्यात 'आनंदाचा शिधा' वाटप सुरू

उमराणे | वार्ताहर Umrane

सामान्य माणसाची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनाने 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सौंदाणे येथे 3 रेशन दुकानातुन सुमारे 1550 कुटुंबानाआनंदाचा शिधा मिळण्यास सुरुवात झाली.

याचा शुभारंभ सरपंच डॉक्टर मिलिंद पवार व उपसरपंच सागर पवार यांच्या हस्ते करण्यात आला सरपंच पवार यांनी याप्रसंगी बोलताना गोरगरिबांना दिवाळीत 100 रुपयात चार वस्तू मिळत असून त्यामुळे यंदाची दिवाळी गोड झाली आहे .

रेशनधारकांनी हा आनंदाचा शिधा लवकरात लवकर घेऊन जावा असेआवाहन केले आहे याप्रसंगी मंडळ अधिकारी गणोरे, तलाठी अमोल पगार, शिवसेना मध्यवर्ती शहर प्रमुख संदीप पवार सामाजिक कार्यकर्ते चेतन पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com