आदिवासींना २५० निर्धूर चुलींचे वाटप

रोटरी क्लब ऑफ नाशिकने जपली बांधिलकी
आदिवासींना २५० निर्धूर चुलींचे वाटप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे पेठ तालुक्याच्या आदिवासी भागातील गरजू २५० कुटुंबांना निर्धूर चुलींचे वाटप करण्यात आले. निर्धूर चुली मिळाल्याने येथील आदिवासी महिलांनी आनंद व्यक्त केला...

पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील झरी, बेहेरेपाडा, अंबास, नवीनपाडा, पळशी आणि हेदमाळ या आदिवासी पाड्यावर राहणार्‍यांना महिला वर्षानुवर्षे पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करतात.

यामुळे होणार्‍या धुरामुळे त्यांना निरनिराळ्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत. रोटरी क्लब ऑफ नाशिकने येथील महिलांची गरज ओळखून तब्बल 250 कुटुंबांना इंधन बचत, पर्यावरण रक्षण अशी वैशिष्ट्ये असलेल्या निर्धूर चुलींचे वाटप करून धुराच्या त्रासातून मुक्त केले आहे.

या प्रकल्पास सिन्नर येथील ऑटोकॉम्प इंडिया प्रा. लि. कंपनीचे आर्थिक सहाय्य लाभले. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा मुग्धा लेले, सचिव तथा सीएसआर संचालक प्रफुल बरडिया, सचिव विजय दिनानी, डॉ. श्रिया कुलकर्णी, विवेक पेंडसे, निलेश गायकवाड, धनश्री गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

ऑटोकॉम्प इंडियाचे संचालक अनिल साळी, रोटरीच्या सदस्या सुजाता राजेबहादूर यांनी सहकार्य केले. तसेच बेहेडेपाडा येथे रोटरीच्या आर्थिक सहकार्याने कांडणी यंत्राचा शुभारंभही अध्यक्षा मुग्धा लेले यांच्या हस्ते करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ नाशिक गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गम भागाच्या विकासासाठी कार्यरत आहे. समाजाच्या गरजा लक्षात घेवून घरोघरी शौचालय बांधून देणे, आरोग्य निदान शिबिर, औषधे वाटप यांसारखे कार्यक्रम रोटरीच्या माध्यमातून घेतले जातात. याशिवाय काही आदिवासी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य निर्माण करून देण्यात रोटरी संस्थेला मोठे यश मिळाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com