शिवभोजन थाळी
शिवभोजन थाळी
नाशिक

१५ लाख ७८ हजार ७४८ शिवभोजन थाळ्यांचे वाटप

जुलै महिन्यातील पंधरा तारखेपर्यंत

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : राज्यात दि. ०१ जुलै ते दि. १५ जुलै पर्यंत ८६९ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे १४ लाख ७८ हजार ७४८ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ०४०, जून महिन्यात ३० लाख ९६ हजार २३२, जुलै मध्ये आतापर्यंत १४ लाख ७८ हजार ७४८ असे एकूण दि.०१ एप्रिल ते दि. १५ जुलै या कालावधीत १ कोटी ४ लाख ५८ हजार २७७ शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com