१७ ऑगस्टपासून दहावी गुणपत्रिकांचे वाटप

१७ ऑगस्टपासून दहावी गुणपत्रिकांचे वाटप
result

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या गुणपत्रिका १७ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठराविक दिवशीच गुणपत्रिका नेण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करू नये, अशी सूचना राज्य मंडळाने शाळांना केली असून याबाबतचे परिपत्रक सर्व विभागीय मंडळाच्या सचिवांना पाठविण्यात आले आहेत.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या शाळांची संख्या लक्षात घेऊन जास्त वितरण केंद्रे निर्माण करणे किंवा त्याच वितरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून वितरण खिडक्यांची संख्या वाढवून गुणपत्रिका वितरित कराव्यात. विभागीय मंडळाकडून शाळांना १४ ऑगस्ट आणि १७ ऑगस्टला गुणपत्रिका वितरित करण्यासाठी दिल्या जातील.

तर १७ ऑगस्टपासून शाळांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार शासनाच्या नियमांचे पालन करून गुणपत्रिका विद्यार्थ्यांना द्याव्यात. विद्यार्थ्यांनी ठरावीक दिवशीच शाळेत येऊन गुणपत्रिका घेण्याची सक्ती करण्यात येऊ नये, शाळांमध्ये पालक-विद्यार्थ्यांची एकाच वेळी गर्दी न होण्याबाबत नियोजन करावे, असे आदेश राज्य मंडळाचे सचिव डॉ. भोसले यांनी विभागीय मंडळाच्या सचिवांना दिले आहेत.

दिनांक १७ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपासून संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांना त्यांचे गरजेनुसार व सोईनुसार तसेच आरोग्य विभागाच्या सर्व नियमांचे व सूचनांचे पालन करुन गुणपत्रक वितरण करावे. याबाबत सर्व शाळांना परिपत्रकान्वये कळवावे. तसेच गुणपत्रिका वितरणासाठी वितरण केंद्रावर स्थायी लिपीक व शिपाई पाठविण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश विभागीय मंडळांनी शाळांना द्यावे असे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com