पंचवटी अमरधाम येथे १० टन बायोकोल बिकेट्सचे वाटप

पंचवटी अमरधाम येथे १० टन बायोकोल बिकेट्सचे वाटप

नाशिक | Nashik

करोना महामारीमधे नाशिक शहरात रोज होणाऱ्या मृत्यूची संख्या मोठया प्रमाणात वाढली असल्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांचा वापर खुप होत आहे.

सध्याची ऑक्सीजनची परिस्थिती लक्षात घेता वृक्ष तोड न करणे हे किती गरजेचे आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखील झाले आहे.

लाकडांसाठी वृक्ष तोड केली जाते व पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास होतो, म्हणून अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडाला पर्याय म्हणून स्वामी समर्थ बायोकोल बिकेटस् प्रा.लि.कंपनीच्या वतीने नाशिक नगरीचे महापौर सतिष कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, नाशिक पुर्व विधानसभा क्षेत्राचे आ.ॲड.राहूल ढिकले, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सुनिल केदार, शहर सचिव अमित घुगे, धनंजय माने, चंद्रशेखर पंचाक्षरी या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचवटी अमरधाम येथे रुपये पंन्नास हजार किंमतीचे 10 टन बायोकोल बिकेटस् (व्हाईट कोल) प्रदान करण्यात आले.

हे बायोकोल बिकेटस् शेंगा टरफल, लाकडी भुसा, मका बिट्टी, झाडांचा पालापाचोळा या पासून बनविल्या जाते. त्यांची ज्वलन क्षमता हि लाकडापेक्षा जास्त असून जाळल्यानंतर कार्बन डाय ऑक्साईड तयार होत नाही म्हणजेच प्रदुषण होत नाही आणि म्हणून सध्याची परिस्थितीती लक्षात घेता या कंपनीने नाशिक मनपाच्या अमरधाममधे बायोकोल बिकेटस् दिले आहे.

या कंपनीचे संचालक सचिन मोहिते, प्रकाश भोये, मधूसुदन वाडे यांनी सामाजिक बांधिलकी या भावनेतून हि मदत केलेली आहे. आज पहिल्या टप्यात त्यांनी १० टन बायोकोल बिकेटस् दिले आहे. भविष्यातही अजून देण्याचा त्यांचा मानस आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com