एक हजार मोफत चष्मे वाटप

स्व.हरिभाऊ फडोळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ उपक्रम
एक हजार मोफत चष्मे वाटप

नाशिक | प्रतिनिधी

स्व. हरिभाऊ फडोळ ( Late Haribhau Fadol )यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ भाजप ( BJP) कार्यकर्ते शरद फडोळ यांच्या वतीने परिसरातील तब्बल एक हजार नागरिकांना मोफत चष्मा वाटप (Distribute free spectacles to over a thousand citizens ) करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप तर्फे शरद फडोळ यांच्या वतीने परिसरात विविध ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबीर राबविण्यात आले होते.शिबिरात ज्या ज्या नागरिकांना चष्मा लागला होता अशा तब्बल एक हजार नागरिकांना यावेळी मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, आ. सिमा हिरे, शहर सरचिटणीस जगन पाटील, मंडल अध्यक्ष अविनाश पाटील,नवीन नाशिक भाजप युवा मोर्चा अध्यक्ष डॉ. वैभव महाले, माजी नगरसेविका प्रतिभा पवार,माजी नगरसेविका सुमन फडोळ,अंबड गावचे माजी सरपंच वामनराव दातीर, नितीन गायकर देवकीनंदन गो शाळेचे संचालक मधुकर फडोळ आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.