ब्रेक द चेनच्या निर्बंधा बाबत उद्योगक्षेत्रात नाराजीचा सूर

ब्रेक द चेनच्या निर्बंधा बाबत उद्योगक्षेत्रात नाराजीचा सूर

सातपूर । प्रतिनिधी

राज्य शासनाने ब्रेक द चेन या उपक्रमा अंतर्गत उद्योगक्षेत्र सुरू ठेवले असले तरी उद्योग चालवण्यासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टी व त्याची पूर्तता करणे लघु मध्यम उद्योगांना कठीण झालेले असल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केली आहे

राज्य शासनाने उद्योगांना सुरू ठेवण्याची परवानगी दिली असली तरी अप्रत्यक्षपणे उद्योग बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. कोणता छोटा उद्योजक कामगारांना आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था करू शकत नाही. यासोबतच फक्त उद्योग सुरू केले असले तरी सप्लाय चेन बंद राहिल्यास उद्योग सुरु करुन काय उपयोग? त्यामुळे थेट आठ दिवस बंद जरी आदेश दिले असते तरी योग्य होते. हे आदेश म्हणजे अप्रत्यक्षपणे उद्योगांना बंदचेच आदेश आहेत.

-वरुण तलवार (अध्यक्ष आयमा)

शासनाने यावेळी लावलेले निर्बंध हे लघुउद्योजक छोट्या उद्योजकांसाठी कठीण ठरणार आहेत. पुरवठा करणारे कच्च्या मालाची दुकाने बंद राहणार असल्याने कारखाना कसा चालवायचा हा प्रश्न समोर येणार आहे. यासोबतच मनुष्यबळाला वाहनांची व्यवस्था करणे छोटे उद्योजकाला परवडणारी नाही. त्यामुळे शासनाचे हे निर्बंध पाळणे कठीण ठरणार आहे.

- एस के नायर (अध्यक्ष लघु उद्योग भरती सिन्नर)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com