सेसवरून जि. प. सदस्यांमध्ये खदखद

सेसवरून जि. प. सदस्यांमध्ये खदखद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेला Zilla Parishad Nashik मिळालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या distribution of funds समान वाटपावरून सदस्यांमध्ये असलेली खदखद उफाळून आली असतानाच आता सेस निधी Cess funds वाटपावरूनही सदस्यांमध्ये खदखद सुरू झाली आहे.

एका मृत झालेल्या सदस्याचा सेस, रद्द झालेल्या ओझर गटातील सेस तसेच रिक्त असलेल्या कनाशी गटातील सेस निधीचे ठराविक सदस्यांना वाटप झाल्याने शिवसेनेच्या एका सदस्याने आक्षेप घेतला आहे.

मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा झाली. यात सेस निधीवाटपाचे अधिकार अध्यक्षांना देण्यावरून सदस्यांमध्ये दोन गट पडले होते. महिला सदस्यांनी अध्यक्षांना अधिकार देण्यास विरोध दर्शवला होता. मात्र काही ठराविक सदस्यांनी सभेच्या समरोपात हा ठराव करत सेस वाटपाचे अधिकार अध्यक्षांना दिले. त्याचवेळी सदस्यांनी समान वाटपाचा अधिकार देण्याचाही ठराव केला होता. सेस निधीचे वाटप करण्यात आले.

ओझर गटाचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने हा गट रद्द झाला आहे. तर कळवण तालुक्यातील कनाशी गटाची निवडणूक प्रक्रिया न झाल्याने ही जागाही रिक्त आहे. या तिन्ही गटातील सेस निधीचे वाटप करताना त्या गटात न करता तो निधी काही ठराविक सदस्यांना दिल्याने इतर सदस्यांनी यास आक्षेप घेतला आहे. सेसचा हा निधी शिवसेनेच्याच निफाड तालुक्यातील एका सदस्याला देण्यात आला आहे.

अध्यक्षांच्या या निर्णयाला शिवसेनेचे इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव गटाचे सदस्य हरदास लोहकरे यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत गटनिहाय माहिती मागवली आहे. ही माहिती मागवल्याने सेस निधीवाटप करण्यासंदर्भातील फाईलीला ब्रेक लागल्याची चर्चा आहे. सेसचे वाटप अध्यक्षांनी केले असून ते शिवसेनेचे असून निधी शिवसेनेच्या सदस्याला दिला आहे. तर आक्षेप घेणाराही शिवसेनेचाच सदस्य असल्याने शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com