सिन्नर शहरातील उपनगरांचा पाणीपुरवठा विस्कळीत

सिन्नर शहरातील उपनगरांचा पाणीपुरवठा विस्कळीत

सिन्नर। वार्ताहर | Sinnar

शहराला नियमित व वेळेवर पाणीपुरवठा (Water supply) होत असून शहरालगच्या उपनगरांत विस्कळीत पाणीपुरठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. आडव्या फाट्यापासून पश्चिमेला सरदवाडीपर्यंत उपनगरांचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे.

सध्या या भागाला नवीन जलवाहिनीद्वारे कडवा धरणाचे (Kadva Dam) पाणी पिण्यासाठी पुरवले जाते. या योजनेमुळे उपनगरवासीयांना पुर्वीपेक्षा चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा होवू लागला. जिल्ह्यातील अनेक गावे पाण्यासाठी त्रस्त असताना सिन्नरकर (sinnar) पाण्याच्या बाबतीत खुषीत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जलवाहिनी मधून मधून फुटण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे वारंवार उपनगरातला पाणी पुरवठा (Water supply) विस्कळीत होतो आहे.

एक दिवसाआड पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र, आठवड्यापासून पाणी आले नव्हते. शहराला नियमीत आणि वेळेवर पाणी पुरवठा होतो. मग उपनगरांनाच का अनियमित पाणीपुरवठा (Irregular water supply) ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पाण्याची वेळ ठराविक नसते, दिवस दिवस भर घरी थांबून माणसे पाण्याची वाट पाहत राहतात. नवरा-बायको दोघेही नोकरीला असतील तर त्यांचे हाल होतात.

खरं पाहता उपनगरांकडून नगर परिषदेला (nagar parishad) सर्वात जास्त पाणीपट्टी (water tax) व घरपट्टी (house tax) मिळते. नगर परिषद वर्षभराचे नियमित पाणी पुरवठ्याचे पैसे वसूल करते. शहराला नियमीत पाणीपुरवठा होत असतांना उपनगरांकडे मात्र, दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची भावना आहे.

वास्तविक या भागातील नगरसेवक (corporator) अतीशय कर्तव्यदक्ष आहेत. जलवाहिनी वारंवार फुटत असेल तर ते तरी काय करणार? मात्र, प्रशासनाने या गोष्टीत लक्ष घालावे. उपनगरवासीयांना वेळेवर व नियमित पाणी मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com