इंदिरानगर, पाथर्डी भागातील उद्यानांतील खेळण्यांची दुरवस्था

इंदिरानगर, पाथर्डी भागातील उद्यानांतील खेळण्यांची दुरवस्था

इंदिरानगर । वार्ताहर | Indiranagar | Nashik

इंदिरानगर (Indiranagar) व पाथर्डी (Pathardi) भागात नाशिक महानगरपालिकेकडून (Nashik Municipal Corporation) बसवण्यात आलेल्या खेळण्यांची दुरवस्था झाली असून दुरुस्ती व स्वच्छता न केल्याने अनेक लहान बालके या खेळण्यापासून वंचित राहत आहेत.

जुन्या प्रभाग 30, 31 मधील महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वेगवेगळ्या भागात असलेले उद्यान (garden) व त्या ठिकाणी असलेल्या खेळण्या (toys) तुटल्याने व त्याची निगा न राखल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. काही भंगारवाले याच्यावर हात साफ करत असल्याचा संशय ही रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

शिव कॉलनी, वासननगर, प्रशांतनगर, मुरलीधरनगर, दामोदरनगर व विविध भागांत असलेल्या खेळण्यांना गाजरगवतांनी वेढलेले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव (Mosquito infestation) वाढला आहे.

खेळण्यांचा लहान बालकांंना काहीच उपयोग होत नाही. नासिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) दुर्लक्षामुळे वेगवेगळ्या भागात असलेले उद्यान व त्या ठिकाणी असलेल्या खेळण्या तसेच गेट भंगारवाल्यांच्या पोट भरण्यासाठी ठेवले का? अशा प्रकारचे प्रश्नही रहिवासी उपस्थित करीत आहेत. नागरिकांच्या करामधून झालेला खर्च अशा पद्धतीने वाया गेल्याचा दिसत आहे.

नाशिक शहरातील (nashik city) उद्यान विभागात (Department of Parks) कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे अनेक उद्यानांची परिस्थिती अशा पद्धतीचे झाले आहे. खरंतर उद्यान विभागाने दरमहा प्रत्येक उद्यानाचे पाहणी करून त्याचा अहवाल विभागीय अधिकार्‍यांकडे दिले पाहिजे.

शिवकॉलनीतील रहिवाशांनी नागरिक समस्या निवारण समिती नाशिक जिल्हा (Citizens Problem Redressal Committee Nashik District) संदीप जगझाप यांच्याकडे तक्रार केली आहे. संदीप जगझाप व स्थानिक नागरिक यासंदर्भात नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांची लवकरच भेट घेणार आहेत.

लोकवस्तीमधील उद्याने टिकून ठेवणे काळाची गरज आहे. नागरिक कर भरतात व त्या भागातील समस्यांबाबत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे तक्रार कोणाकडे करावी, अशी शंका उपस्थित करत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक नागरिक तक्रार आमच्याकडे करत आहे. या उद्यानांच्या दुरवस्थेबाबत आयुक्तांची भेट घेणार आहे.

- संदीप जगझाप

कॉलनीमध्ये उद्यान असल्याने आम्हाला व मुलांना सोयीस्कर आहे. घरचे काम सांभाळून आम्ही व घरातील ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना उद्यानामध्ये घेऊन जातात. तसेच आमचांपण विरंगुळा होतो. मात्र उद्यानातील दुरवस्थेमुळे हिरमोड होतो.

- स्वाती निकम

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com