जिल्हा परिषद
जिल्हा परिषद
नाशिक

आरोग्य विभागातर्फे जादा दराने खरेदीची चैाकशी होणार

जिल्हा परिषद

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत करण्यात आलेली औषध साहित्य खरेदी वादात सापडण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात करोना तपासणीसाठी घेण्यात आलेले स्कॅनर व तापमान (टेम्परेचर) गण जादा दराने खरेदी केली आहे.अशी तक्रार आमदार दिलीप बनकर यांनी जि.प.शासनाकडे केली आहे. ग्रामपंचायतींनी खरेदी केलेल्या दरापेक्षा दुपटीने ही साहित्य खरेदी झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन प्रशासनाने त्यांना दिले.

जिल्हा परिषदेत कृषीमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नुकतीच करोना आढावा बैठक झाली.बैठकीत आमदार बनकर यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या साहित्याबाबत प्रश्न उपस्थित केले. ग्रामीण भागात रूग्णालयांमध्ये येणाऱ्या रूग्णांचा ताप मोजण्यासाठी टेम्परेचर गण खरेदी करण्यात आली. तसेच रूग्णालयांमध्ये स्कॅनर खरेदी झाली आहेत. यात टेम्परेचर गण हे दुपटीपेक्षा जास्त दराने खरेदी केल्याचे बनकर यांनी निदर्शनास आणून दिले.

ग्रामपंचायतींमध्ये देखील टेम्परेचर गणची खरेदी झाली.मात्र ती, गण निम्या दरात खरेदी केल्याचे बनकर यांनी सांगत, ग्रामपंचायतींकडून करण्यात आलेली खरेदी देखील निदर्शनास आणून दिली.जादा दराने खरेदी करून शासनाचे नुकसान नाही का ?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.यावर, खुलासा करतांना अधिकाºयांची भांबेरी उडाली.परंतू, झालेल्या खरेदीत तक्रार असल्यास त्यांची चौकशी करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

योग्य पध्दतीने खरेदी- आरोग्याचा दावा

आरोग्य विभागातंर्गत लेप्यू कंपनीचे ४६८ मशीनची खरेदी केली आहे.टेंडरव्दारे ही खरेदी प्रक्रीया राबविण्यात आली.त्यासाठी १० कंपन्यांचे टेंडर प्राप्त झाले होते.यातील कमी दर असलेल्या कंपनीस टेंडर देऊन ही खरेदी झाली आहे.खरेदी प्रक्रीया राबवितांना बाजारात या मशीनचे दर ६ हजार १०० रूपये इतके होते.पंरतू, आरोग्य विभागाने दर कमी करण्याची मागणी केल्याने ४ हजार ८०० रूपयाला या मशीनची खरेदी झाली.

याच प्रकारचे मशीन नंदुरबार, धुळे, जळगाव आरोग्य विभागाने देखील खरेदी केली आहे. त्याच धर्तीवर ही खरेदी केली. मशीनला दोन वर्षाची गॅरेटी आहे. आतापर्यंत मशीनच्या कोणत्याही तक्रारी आल्या नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आरोग्य विभागातंर्गत खरेदी करण्यात आलेले टेम्परेचर गण व स्कॅनरचे दर जादा असून, दुपटीपेक्षा जादा दराने ही खरेदी केली आहे. करोनासाठी शासन निधी देत आहे. मात्र, निधीचा दुरोपयोग होता कामा नये. शासनाचा पैसा वाया जाऊ नये हाच उद्देश आहे.

-दिलीप बनकर (आमदार, निफाड)

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com