लोक अदालतीत २६ हजार प्रकरणांचा निपटारा

लोक अदालतीत २६ हजार प्रकरणांचा निपटारा

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये (District Court) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत (Lokadalat) २६ हजार १८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहेत. त्यातून ५७ कोटी ३७ लाख ४४ हजार ६०८ रुपयांचे तडजोड शुल्क, नुकसान भरपाई वसूल केली आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona Crisis) न्यायालयीन कामकाजावर अनेक बंधने आली होती. त्यामुळे न्याय मिळण्यासही विलंब होत होता. दरम्यान, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या (Maharashtra State Legal Services Authority) वतीने रविवारी (दि.१) राष्ट्रीय लोकअदालतीचे (National Lokadalat) आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यात २४ हजार २१४ प्रलंबित तर १ लाख ३१ हजार ३९६ दावा दाखल पुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित प्रकरणांमधील धनादेश न वटल्याप्रकरणाची ६ हजार ८२९, बँकेची १३५, अपघातांची २३२, कामगार विषयक ९, कौटुंबिक वादाची १८१, भुसंपादनविषयीचे ४२, दिवाणी दाव्यांची २७७ व इतर चार अशी एकूण ८ हजार ७०८ प्रकरणांचा निपटारा लोकअदालतीत करण्यात आला आहे.

तर १७ हजार ३१० दावा दाखल पुर्व प्रकरणांचा निपटाराही या लोक अदालतीत झाला. यातून ५७ कोटी ३७ लाख ४४ हजार ६०८ रुपयांचे तडजोड शुल्क व नुकसान भरपाई वसूल करण्यात आली आहे.

लोकअदालतीच्या यशस्वीततेसाठी न्यायाधिश, वकील वर्गाने मेहनत घेतली होती. जिल्ह्यात २९ ते ३१ जुलै दरम्यान प्रलंबित प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली होती. त्यात जिल्ह्यातील न्यायालयात फौजदारी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यानुसार या मोहिमेत १४ हजार ८८२ फौजदारी प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com