महाभुमी प्रकल्प समन्वयकांची हकालपट्टी करा

महाभुमी प्रकल्प समन्वयकांची हकालपट्टी करा

तलाठी संघाकडून कामबंद आंदोलनाचा इशारा

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

सध्या पावसाने (heavy rain) झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असतांनाच शासनाचे महाभुमी प्रकल्पाचे (mahabhumi project) समन्वयक रामदास जगताप यांनी तलाठी संघटनेचे पदाधिकारी (talathi association) यांना असंविधानिक शब्द वापरल्याचा तीव्र निषेध करीत

त्यांची बदली समन्वयक पदावरून इतरत्र न झाल्यास दि.13 ऑक्टोबर पासून नैसर्गिक आपत्ती (natural calamity) व निवडणूक (election work) कामकाज वगळता अन्य सर्व कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. या मागणीसाठी विविध आंदोलने (movement) करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार (tahsildar) शरद घोरपडे यांना देण्यात आले.

तलाठी संघाचे अध्यक्ष नितीन केदार, सरचिटणीस संतोष हिरे यांचे नेतृत्वाखाली निवेदन देत निषेध व्यक्त केला. निवेदनात निफाड तालुका (niphad taluka) तलाठी संघातर्फे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात (maharashtra state) उद्भवलेल्या नैसर्गिक आपती परिस्थितीत युद्ध पातळीवर पंचनाम्याचे काम चालु असून अशा परिस्थितीत ई पिक पाहणी (e-crop survey) व मोफत सातबारा वितरणाचे (free 7/12 extract) काम चालु आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी सातबारा वितरणाचे काम कशा प्रकारे करावे याबाबत राज्यातील तलाठी यांना एक संदेश व्हाटस् अ‍ॅपवर केला होता. परंतु हा संदेश वाचुन प्रकल्प अधिकारी रामदास जगताप यांनी मुर्खासारखे संदेश पाठवू नका असे लिहुन (डीआयएलएमपी) पुणे (pune) या ग्रुपवर तलाठी संघाचे राज्य अध्यक्ष यांचा अवमान केला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी या संवर्गाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

जगताप यांच्या बेजबाबदार व असंवैधानिक वक्तव्याचा निफाड तलाठी संघाने निवेदनात जाहिर निषेध करून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांना निवेदन सादर करून या घटनेचा निषेध करीत विविध आंदोलने सुरू केली असून दि.8 ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून कामकाज करणे, दि.11 रोजी तहसिल कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत निदर्शने करणे, दि.12 रोजी तहसीलदार यांचेकडे डीएससी जमा करणे व रामदास जगताप यांची समन्वयक पदावरून अन्यत्र बदली न झाल्यास दि.13 पासून नैसर्गिक आपत्ती व निवडणूक कामकाज वगळता अन्य सर्व कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील (nashik district) सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सहभागी होणार असून संघटनेचे उपाध्यक्ष अभिजित पाटील, सहचिटणीस शंकर खंडागळे, खजिनदार निखिल शिरोडे, सल्लागार एन.वाय. उगले, पुष्कराज कैवारे, सोमनाथ खैरे, संघटक महेश सहदेव गायकवाड, शितल कुटे, सदस्य उल्हास देशमुख, नंदू कुंदे, गीता कनोज, विनोद ठाकूर, भाऊसाहेब भोई, संतोष माळी, मोतीराम पाटील, सीमा धारक, शशिकांत चिताळकर, गजानन डोके, गणेश जगताप, असिफ पठाण, सागर शिर्के, अनिल बावस्कर, दत्ता गोटे, लक्ष्मीकांत शिंदे, प्रसाद देशमुख आदींसह कामगार तलाठीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.