नवीन नाशिक । New Nashik (प्रतिनिधी)

त्रिमूर्ती चौक ते पवन नगर दरम्यान असलेल्या मुख्य रस्त्यावर रस्ता दुभाजकाला लागून असलेल्या पोलवर मनपाची कोणतीही परवानगी न घेता होर्डिंग लावल्याने परिसराचे विद्रुपीकरण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

येथील त्रिमूर्ती चौक ते पवन नगर हा रस्ता अंबड औद्योगिक वसाहतीला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने दिवस रात्र या रस्त्यावर वर्दळ सुरूच असते. याठिकाणी बर्याचदा मनपाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता काही राजकीय लोक बॅनरबाजी करीत असतात.

या प्रकाराकडे अधिकार्यांनी लक्ष दिले तर त्यांना राजकीय लोकांकडुन दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे.

यामुळे याप्रश्नी कोणतेही कारवाई होतांना दिसत नसल्याचे नागरिकांचे मत आहे. सध्या नाशिक शहर हे स्मार्ट सिटीच्या दिशेने करत आहेत या पार्श्वभूमीवर शहरात विविध विकास कामे सुरू आहेत तर शहर सुशोभिकरणाकडे मनपा लक्ष देत आहे. नवीन नाशिक परिसरात अनेक ठिकाणी मनपाची परवानगी न घेता होर्डिंग लावण्यात येतात.

त्यामुळे परिसराला विद्रुपीकरणाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत मनपाने योग्य ती उपाययोजना करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.