सोळा गाव पाणीपुरवठा संदर्भात पाणीपुरवठा मंत्र्यांना साकडे

सोळा गाव पाणीपुरवठा संदर्भात पाणीपुरवठा मंत्र्यांना साकडे

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

लासलगाव (lasalgaon), विंचूरसह (vinchur) सोळा गावांना नांदूरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar Dam) धरणातून पाणीपुरवठा (Water supply) करणारी पाईपलाईन (Pipeline) अतिशय जिर्ण झाल्याने ती जागोजागी फुटत असून वरील गावांना अनेकवेळा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

परिणामी या योजनेसाठी नविन पाईपलाईन टाकावी यासाठी शिवसेनेचे (shiv sena) तालुका प्रमुख प्रकाश पाटील (prakash patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Water Supply Minister Gulabrao Patil) यांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा केली. या पाणीपुरवठा योजनेसाठी 17 कोटी 54 लाख 42 हजार 500 रु. खर्च करून नविन पाईपलाईनचे काम पाणीपुरवठा विभागाच्या (Water Supply Department) वतीने लवकर पूर्ण करून देण्याचे आश्वासन पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी दिल्याचे शिवसेनेचे प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे.

लासलगाव व परिसराला नांदूरमध्यमेश्वर येथील दारणा (darna), गोदावरी (godavari), कादवा (kadva) या नद्यांचे मुख्य धरणात भरपूर पाणीसाठा असतांना नागरिकांना पाण्याच्या गंभीर त्रासाला गेल्या कित्येक वर्षांपासून सामोरे जावे लागत असल्याने शिवसेना पदाधिकार्‍यांनी ना.गुलाबराव पाटील यांची भेट घेत वरील माहिती त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

परिणामी या पाणीपुरवठा योजनेसाठी 17 कोटी 54 लाख 42 हजार 500 रुपये खर्च करून नवीन पाईपलाईनचे काम पाणीपुरवठा विभागाच्या वतीने लवकरच पुर्णत्वास नेणार असल्याचे ना.पाटील यांनी स्पष्ट करून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना आश्वासित केले. तसेच नाशिक जिह्याचे (nashik district) पालकमंत्री ना. छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनीही या योजनेसाठी शर्थीने प्रयत्न केले असून ही योजना लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल असे ना. पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ व पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून लासलगाव सह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन कायमस्वरूपी दुरुस्ती करून व वाढीव नवीन पिण्याच्या टाक्यांचे काम सुरू करून पूर्णत्वास न्यावे व नागरिकांना कायमस्वरूपी दररोज पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी प्रकाश पाटील व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी या भेटी दरम्यान केली असल्याची माहिती ग्रा.पं. सदस्य दत्ता पाटील व अमोल थोरे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com