
निफाड । प्रतिनिधी | Niphad
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बंदरे व खनिजकर्ममंत्री दादा भुसे (Guardian Minister and Minister of Ports and Mineral Works Dada Bhuse) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या (Maharashtra State Primary Teachers Committee) शिष्टमंडळाने ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेऊन शिक्षकांच्या (teachers) प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा केली.
या चर्चेत प्रामुख्याने वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा (school) बंद करू नये, जिल्ह्यांतर्गत बदल्यांची कार्यवाही लवकर व्हावी, जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी, मुख्यालयाची अट रद्द करावी यासह अन्य प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळासोबत प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
तसेच भुसे यांनी शिक्षक समितीच्या (Teachers Committee) ओरोस येथील ऐतिहासिक राज्य अधिवेशनाचा संदर्भ देत शिक्षक समितीच्या कार्याबाबत मुख्यमंत्र्यांना शिक्षक समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या येणार्या राज्यस्तरीय अधिवेशनास (State Level Convention) उपस्थित राहण्याचे आश्वासनदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिले.
या शिष्टमंडळात ज्येष्ठ मार्गदर्शक विश्वनाथ मिरजकर, राज्य नेते काळू राज्य कोषाध्यक्ष केदू देशमाने, राज्य संघटक सयाजी पाटील, किरण गायकवाड, नाशिक जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, शशिकांत भागवत, जिभाऊ बच्छाव, चंद्रभान पवार, भाऊसाहेब पवार, उमेश पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.